लेख

विजया एकादशी

विजया एकादशी महत्व – 

सनातन धर्मात एकादशी उपवासाचे विशेष महत्त्व आहे. दरमहीन्यात दोन वेळा म्हणजे कृष्ण आणि शुक्ल पक्षाला एकादशी असते . प्रत्येक एकादशीला एक वेगळे नाव आणि महत्व आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणार्‍या एकादशीला विजया एकादशी म्हणतात.


महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी येते ही तिथी

विजया एकादशी प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या २ दिवस आधी साजरी केली जाते. या दिवशी विष्णुंदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की जर या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि उपवास निर्मळ मनाने केली गेली तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.


विजया एकादशीला विष्णुंची पूजा कशी करावी

विजया एकादशीला दैनंदीन कामे आटोपल्यावर स्वच्छ नवी वस्त्र घालून एकादशीच्या व्रताचा संकल्प करा. पूजा करण्यापूर्वी पाटावर पूजा आखून त्यावर ७ प्रकारचे धान्य ठेवा. यानंतर यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवा. पिवळी फुले, फळे आणि तुळस अर्पण करा. यानंतर धूप पेटवा आणि तूपाचा दिवा लावून आरती करा.


विजया एकादशीला अशी काळजी घ्या

व्रताच्या संध्याकाळी भगवान विष्णूची आरती केल्यानंतरच फराळ करा. रात्री झोपेऐवजी परमेश्वराची स्तुती करा. उपवास सोडायच्या आधी दुसर्‍या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्या. त्यांना शक्य तेवढी देणगी द्या. यानंतर,उपवास सोडा. जेवतांना भगवान विष्णूंकडे काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमाप्रार्थना व्यक्त करा.


विजया एकादशी पूजेचे महत्त्व

पौराणीक कथेनुसार स्वत: मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकेवरील विजयासाठी विजया एकादशीचा उपवास केला होता. म्हणून या एकादशीला विजया एकादशी असे नाव देण्यात आले. त्याच बरोबर पुराणानुसार विजया एकादशीचे व्रत केल्यास आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा तुटवडा जाणवत नाही. सोबतच मोक्ष प्राप्ती मिळते. याशिवाय ह्या व्रतामुळे वाईट दृष्टी लागत नाही असेही म्हटले जाते. आपल्या मनात नेहमी भिती आणि नकारात्मकता असेल तरी हा उपवास केल्याने ही नकारात्मकता नाहीशी होते.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: maharashtratimes

View Comments