लेख

वरुथिनी एकादशी

चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी श्रीविष्णूंच्या वराह अवताराचे पूजन केले जाते. वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना श्रीविष्णूंचे संरक्षण, कवच मिळते, अशी मान्यता आहे. वरुथिनी एकादशीला श्रीविष्णूंची पूजा करावी. यावेळी विष्णूसहस्रनामाचे पठण करणे फलदायी मानले जाते. या व्रतामध्ये श्रीविष्णूंच्या दशावताराची कथा ऐकावी किंवा त्यांचे स्मरण करावे. या व्रताचा संकल्प करून पूजन केल्यानंतर दिवसभर केवळ फलाहार करावा, असे सांगितले जाते.


हे पण वाचा: एकादशी का करतात


वरुथिनी एकादशी – महत्व

यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथिनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते. वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, सर्व पाप नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे. हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्ती होते आणि या वरूथिनी एकादशीच्या पराभवामुळेच राजा मंधाता स्वर्गात पोहचले होते. वरुथिनी एकादशीचे फळ दहा हजार वर्षापर्यंत तप करण्यासमान आहे.

कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी एक मण स्वर्णदान केल्याचे जे फळ असते, ते फळ वरूथिनी एकादशी व्रत केल्याने प्राप्त होते. वरुथिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो. या एकादशीचे व्रत गंगा स्नानच्या फळापासून देखील अधिक आहे, असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते.


नियम

प्रत्येक एकादशी प्रमाणेच या एकादशी व्रताच्या नियमांचे पालन दशमी तिथीपासून सुरू होते.

दशमीच्या दिवशी सात्विक भोजन घ्यावे

दुसर्‍या दिवशी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करुन व्रताचा संकल्प करा.

पाणी अर्पण करतांना ‘ऊं सूर्याय नमः’ हा जप करावा.

या वर्षी घरीच लक्ष्मीनारायणाच्या फोटो किंवा मुर्तीचे पूजण करावे.

पूजेमध्ये भगवान विष्णूंचे स्मरण करावे,

शंख वाजवावा आणि ‘ऊँ नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

एकादशीला फक्त फलहार करावा. तसेच गरजू निराधार आणि ब्राम्हणास दान भोजन द्यावे.



शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Ref: maharashtratimes

वरुथिनी एकादशी व्रत कथा  । varuthini ekadashi । varuthini ekadashi mahatmya । varuthini ekadashi vrat katha ।