रंगपंचमी सणाची संपूर्ण माहिती विडिओ सहित
फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो. गेलेल्या कडक उन्हाळ्यापासून अंगाची दाह शांत व्हावी म्हणून रंग उधळले जातात. यावेळी विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते. रंग उडविण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाच्या निर्मितीमागे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहेत.
रंगपंचमी( rang panchami ) – इतिहास
द्वापरयुगात गोकुळात बाल/कुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. मध्ययुगात संस्थानिक, राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत
रंगपंचमी( rang panchami ) – महत्त्व
रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे.
स्वरूप
देशाच्या काही भागात या लोकप्रिय सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात. व्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत असे मानले जात असल्याने, उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्त्वही आहे.
सद्यस्थिती
रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही अलीकडील काळात वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात. फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ,हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जातात.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: marathimol, wikipedia