पापमोचनी एकादशी व्रतला पाप हरणारी एकादशी म्हटलं जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जर व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीसह हे व्रत ठेवा आणि पश्चातापाच्या भावननेने भगवानकडे आपल्या पापांच्या समाप्तीसाठी प्रार्थना करा. तसेच, भविष्यात कुठलंही चुकीचं काम न करण्याची भावना ठेवा, तर भगवान त्या व्यक्तीची मनोकामना पूर्ण करतात आणि त्याला पापांतून मुक्तता मिळते. या दिवशी तन-मनाच्या शुद्धतेसोबतच गीतेचं पठन करावं आणि दान-पुण्य करावं.
कदा, च्यवन ऋषींचा पुत्र गुणवंत मेधावी ऋषी घोर तपश्चर्येत मग्न होते. त्यांच्या तपश्चर्येमुळे सर्व देवता घाबरले आणि त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गातील अप्सरा मंजुघोषाला पाठविलं. मंजुघोषाने नृत्य, गायन आणि तिच्या सौंदर्याने मेधावी ऋषीची तपश्चर्या भंग केली. यानंतर, मेधावी ऋषी त्या अप्सरेवर मोहित झाले आणि तिच्यासोबतच राहू लागले.
काही काळानंतर मंजुघोषाने स्वर्गात परत जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा ऋषी मेधावी यांना त्यांची तपस्या भंग झाल्याच कळावं आणि ते संतापले. त्यानी मंजुघोषाला पिशाच होण्याचा श्राप दिला. मंजुघोषाने ऋषी मेधावीची क्षमा मागितली आणि श्रापातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा मेधावी ऋषींनी त्यांना पापमोचनी एकादशी व्रत ठेवण्याचा सल्ला दिला.
यानंतर जेव्हा मेधावी ऋषी आपल्या वडिलांच्या महर्षी च्यवनकडे पोहोचले. तेव्हा महर्षी च्यवन यांनी त्यांना पापमोचनी एकादशी व्रत ठेवण्यास सांगितले. जेणेकरुन ते श्राप देण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकतील. व्रत ठेवल्यानंतर अप्सरा मंजुघोषा सुद्धा शापमुक्त होऊन आपल्या मूळ स्वरुपात आली. त्याच वेळी, मेधावी ऋषीसुद्धा पापातून मुक्त झाले.
ताच्या दिवशी सूर्योदयावेळी उठा आणि स्नान केल्यावर व्रताचा संकल्प करा.
यानंतर, गणेशाचे ध्यान करा आणि पूजा यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करा.
यानंतर भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा आणि धूप, दीप, चंदन, फुले, फळे, कपडे, भोग आणि दक्षिणा द्या.
पापामोचनी व्रताची कथा वाचा आणि नंतर आरती करा.
दिवसभर व्रत ठेवा. रात्री जागरण भजन कीर्तन करा.
दुसर्या दिवशी द्वादशीला गरजूंना जेवण खाऊ घाला आणि दान द्या. मग आपला व्रत सोडा.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: tv9marathi