navratri information marathi video
अश्विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना. हस्ताच्या सरी कोसळतात, परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते. आजूबाजूची हिरवीगार सृष्टी पाहून मन प्रसन्न होते. निसर्गाच्या सौंदर्याची उधळण पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. अशा वेळी शरद ऋतूचे आगमन होते. धरणीमातेबरोबर सर्वजण सुखावले असतात. अशा या प्रसन्न महिन्यात अनेक उत्सवांबरोबर नवरात्र येते.
वेदकाळात परमेश्वर मंत्रस्वरुपात होता. जसजसा मानव शिल्पकलेत प्रावीण्य मिळवू लागला, तसतसा देव-देवतांना मूर्ती स्वरूपात घडवून त्यांची अनेक रूपे तो प्राणप्रतिष्ठापना करून पुजू लागल्याचे दिसून येते. भारत वर्षाच्या संस्कृतिक इतिहासामध्ये पुराणकाळ हा दैवतदृष्ट्या व उपासनदृष्ट्या अत्यंत समृद्ध काळ मानला जातो. तेव्हा आदिशक्तींना मातृकाशक्ती मानून त्यांचे पूजन सुरु झाले. दैवीशक्ती हि दुर्गा, भवानी, रेणुका, काली, अंबा, महालक्ष्मी , सरस्वती, संतोषी, महिषासुरमर्दिनी, चामुंडा, चंडिका, कालिका, एकविरा, वज्रेश्वरी, हरबसणी, जीवदानी इ. विविध नावांनी उपासली जाते.
भारतात अनेक शक्तिस्थाने आहेत. यातील कित्येक मानवाला अज्ञात असून काही ठिकाणी तर या देवता मूर्ती स्वरूपात आढळतातच, असेही नाही. तरीही हि स्थाने भक्तिभावाने पुजली जातात. नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून नवरात्र उत्सव म्हटला जातो. तामसी, क्रूर वृत्तीच्या दुर्जनांचे प्राबल्य जेव्हा भूतलावर वाढते, तेव्हा त्या दुर्जनांपासुन साधू सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देवी अवतार धारण करते. ती म्हणते, “भक्तांनो, मी तुमच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहे. तुम्ही मला शरण आलात कि, मी प्रगट होईन तुम्हास दुःखमुक्त करिन. त्यासाठी तुम्ही अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस माझा उत्सव साजरा करीत जा. घटपूजा, होमहवन आदी करून माझे पूजन करा. जे माझ्यावर अचल निष्ठा ठेवतील, त्यांच्यामागे मी नेहमीच असें. “
हा उत्सव साजरा करण्याचा सर्वांना अधिकार आहे. प्रतिपदेस देवळात किंवा घरी घटस्थापना केली जाते. नऊ दिवस सप्तशक्तीचा पाठ वाचला जातो. नऊ दिवस नंदादीप तेवत असतो. रोज एक माळ वाढवितात. एकूण नऊ माळा होतात. घराशेजारी धान्याची पेरणी करतात. त्या धान्याला अंकुर येतात ते दसऱ्याच्या दिवशी टोपीत किंवा पागोट्यात घालतात. नवव्या दिवशी होम होतो. ब्राम्हण व सुवासिनींना जेवावयास बोलावले जाते. होमात कोहळा अर्पण करतात. शेवटच्या दिवशी होमहवन होते. याचे उत्थापन व विसर्जन विजयादशमीला होते.
विष्णूच्या हातात सुदर्शन चक्र, रामजवळ धनुष्यबाण आणि परशुरामजवळ परशु असे प्रत्येकि एकच शस्त्र असताना या डिव्हिजवळ मात्र अनेक शस्त्रे आहेत. या शस्त्रबळावर ती सामर्थ्यावर, बलवान ठरली.
प्रतापगडाच्या भवानी देवीने श्री शिवछत्रपतींना तलवार प्रसाद म्हणून दिली. या तलवारीच्या सामर्थ्यावरच शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पेशवेसुद्धाप्रतिपादिदिवशी स्वतः घटस्थापना करून अंबेची स्थापना करित असत. द्वितीयेला रेणुकादी चौसष्ट योगिनींची पूजा करीत . तृतीयेला अंबा अष्टभुजा शिणगार घालून विराजमान होत असे. सप्तमीच्या दिवशी सप्तशृंगी गडावर आदिमातेची पेशवयांकडून पूजा बांधली जात असे.
चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकला, जो वज्रेश्वरीच्या प्रेरणेमुळेच. अशा या शक्तिदेवतेचे, आदिमातेचे स्वरूप आपण अनेक रूपात पाहत आलो आहोत. राधेसारखे प्रणयिनीचे रूप, गौरीसारखे ममतामयी रूप किंवा दुर्गेसारखे संहारक रूप या आदिमातेने घेतले आहे.
भारतवर्षात नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
नवरात्री हा हिंदू समाजासाठी एक शुभ सण आहे आणि तो अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. नवरात्रीचा सण नऊ दिवस साजरा केला जातो ज्यात भक्त दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात. मान्सूनोत्तर नवरात्री हिंदू चंद्र महिन्याच्या आश्विन शुक्ल पक्षात साजरी केली जाईल.
यावर्षी नवरात्री 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान साजरी केली जाईल. हा उत्सव नऊ दिवसांचा सर्वात मोठा उत्सव आहे. सणाच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे रंग असतात जे देवीला समर्पित असतात. या नऊ दिवसांसाठी नऊ रंगांचं खूप महत्त्व असते. जाणून घ्या रंगांची यादी आणि त्याचे महत्त्व जे तुम्ही सणाच्या विशेष दिवसांमध्ये घालायला हवे.
प्रतिपदेचा पहिला दिवस गुरुवारी येतो, म्हणून त्या दिवसाचा रंग पिवळा असतो. शारदीय नवरात्रीचा आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी, आपण पिवळा रंग परिधान करावा.
नवरात्रीचा दुसरा दिवस द्वितीया आहे. या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात. हा दिवस हिरवा रंग घालून साजरा केला जातो जो निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग आहे.
शुभ राखाडी रंग नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीयेला घातला जातो. सूक्ष्मतेच्या दृष्टिकोनातून हा राखाडी देखील एक अद्वितीय रंग आहे.
चौथ्या दिवसाचा रंग नारंगी आहे. हा रंग उन्हाळ्याचे प्रतिनिधित्व करतो आणि नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे घालायचे असतात.
पंचमीच्या पाचव्या दिवशी, सोमवारी सर्वशक्तिमान देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी पांढरे रंगाचे कपडे घालावे. पांढरा रंग शुद्धता आणि निरागसपणाचे प्रतीक आहे.
षष्ठीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आपल्या नवरात्रोत्सवासाठी लाल रंग परिधान करा. लाल रंग हा आरोग्य, जीवन, अनंत धैर्य आणि तीव्र उत्कटतेचे प्रतीक आहे.
सप्तमीला निळा रंग परिधान करा, जो बुधवारी येतो. निळा रंग उत्तम आरोग्य आणि समृद्धी आणतो.
भक्तांनी अष्टमीच्या दिवशी गुलाबी रंग परिधान करावा. गुलाबी हे सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि स्त्री आकर्षणाचे प्रतीक आहे. हा सुसंवाद आणि दयाळूपणाचा रंग आहे.
भाविकांनी नवरात्री 2021 च्या नवव्या आणि शेवटच्या दिवशी जांभळा रंग परिधान करावा. हा रंग लाल रंगाची ऊर्जा आणि चैतन्य आणि निळ्या रंगाची रॉयल्टी आणि स्थिरता एकत्र करतो.