संपुर्ण वर्षात २४ एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आणि वेगळे महत्व आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी स्मार्त एकादशी म्हणतात. एकादशीला पौराणिक महत्व प्राप्त आहे. एकादशी केल्याने सहस्त्र गो दान तसेच अश्र्वमेध यज्ञ केल्यावर जितकं पुण्य लाभतं त्याच्या अधिक पुण्य एकादशीचा उपवास केल्याने लाभतं. या महिन्यातील एकादशी रविवार २३ मे रोजी आहे. तर जाणून घेऊया मोहिनी एकादशीचे महत्व, मुहूर्त, कथा…
पौराणीक मान्यतेनुसार एकादशीच्या विविध कथा सांगीतल्या जातात. मोहिनी एकादशीची कथा श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितली होती. कथा अशी आहे की, युधिष्ठिराने देवकीनंदनास प्रश्न केला वैषाख महिन्यातील एकादशीला काय नाव आणि त्याची काय कथा आहे. हे कान्हा कृपया ही कथा सांगावी. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले धर्मराज मी जी कथा सांगतो आहे ती वशिष्ठ ऋषिंनी मर्यादा पुरूषोत्तम रामाला सांगितली होती. एक वेळा रामाने वसिष्ठानां प्रश्न केला गुरूवर्य एखादे असे व्रत सांगावे की ज्यामुळे पापमुक्ती मिळेल आणि सर्व दुखांचा विनाष होईल. मी सीते पासून दूर झालो त्यानंतर नेहमी दुख, निराशा जाणवते.
श्रीरामांच्या या प्रश्नावर वसिष्ठ ऋषी प्रसन्न झाले आणि श्रीरामांना म्हणाले हा उत्तम प्रश्न आहे. तुमची बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. त्यांनी सांगितले की, वैषाख महिन्यात येणारी एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. ही एकादशी केल्याने सर्व पापमुक्त होतात, तसेच दुखाचा विनाश होतो. मोह, माया यातून मुक्ती मिळते. जर कामुक भावना, मोह माया, यांपासून दूर रहायचं असेल तर मोहिनी एकादशी व्रत अतीउत्तम आहे.
मोहिनी एकादशीची आणखी एक कथा अशी की, सरस्वती नदीच्या तिरावर भद्रावती नावाचे एक सुंदर नगर होते. या नगरीचा राजा चंद्रवंशातला होता, त्याचं नाव सत्यप्रतीज्ञ धृतमान होतं. त्याच नगरीत एक धन, धान्य, संपत्ती असलेला सर्वगुण संपन्न धनपाल नावाचा वैश्य राहत असे. तो नेहमी पुण्याची कामे दानधर्म करत असे. तो विष्णू देवाचा भक्त होता. त्याला पाच मुलं सुमना, द्युतीमान, मेधावी, सुकृत, आणि धृष्टबुद्धी होते. चार मुलं त्याच्या सारखेच दानधर्म करायचे परंतु धृष्टबुद्धी नावाचा एक मुलगा नेहमी पापकर्म करत असे.
धनपाल त्याचा मुलगा धृष्टबुद्धी मुळे खूप हताश होता एकेदिवशी त्याने रागाच्या भरात मुलगा धृष्टबुद्धीला घरा बाहेर हाकलून दिलं.
धृष्टबुद्धी इकडे तिकडे भटकू लागला.
त्याच्या विचित्र स्वभावामुळे कोणीच त्याला अन्न पाणी देखील विचारत नसे.
शेवटी दुखी धृष्टबुद्धी कौडिल्य ऋषींकडे आला.
त्याने ऋषींना कळवळून सांगितले की मी अपराधी आहे मात्र मला मुक्ती हवी आहे,
कृपा करून मला काही उपाय सांगा.
तेव्हा ऋषींनी धृष्टबुद्धीला मोहिनी एकादशी व्रताचे महत्व तिथी पूजा विधी सांगीतले.
धृष्टबुद्धी आनंदी झाला आणि त्याने एकादशी व्रत करून सर्व पापांतून मुक्ती मिळवली.
म्हणून हा व्रत करावा आणि त्याची कथा ऐकावी.
भगवान विष्णुंची मनोभावे पूजा करावी आणि सर्व पापांतून मुक्ती मिळवावी
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: maharashtratimes