lakshmi pujan information in marathi
लक्ष्मीपूजन मराठी माहिती विडियो सहित
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.(lakshmi pujan)
प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.(lakshmi pujan)
अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.(lakshmi pujan)
लक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम
लक्ष्मी पूजनाच्या अनेक विधी असल्या तरी आज आम्ही आपल्याला सोपी आणि योग्य पद्धत सांगत आहोत. लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी. तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. तुळशीपासून घरातील देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावीत.
लक्ष्मीपूजन करताना एका चौरंग घ्यावं. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घेऊन त्यात जरा गंगा जल मिसळून 80 टक्के पाण्याने भरुन घ्यावं. हे कलश त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून पाच आंब्याचे पानं त्या भोवती सजवावे. कलशाभोवती ताजी फुलं सजवावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. आता देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. परंतू पुस्तकाचे कव्हर चामड्याचे नसावं. आता पूजेचं सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे. तिलक अनामिका बोटाने करावे. समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप लावा. उदबत्ती वापरु नये कारण उदबत्तीची बांबूची असल्याने पूजेत वापरु नये. पूजा स्थळी केससुणीची पूजा करावी.
आता हातात फुलाच्या पाखळ्या, अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि मग लक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र किंवा ऊँ महालक्ष्मयै नम: जप करु शकता. षोडशोपचार पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे. पूजा झाल्यावर आरती करावी. आरती नंतर देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करावी.
या दरम्यान विशेष काळजी घेण्यासारख्या गोष्टी
या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरु ठेवावे.
श्री सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे.
ऐन लक्ष्मी पूजनावेळी कोणासोबतही नगद पैशांच्या व्यवहार करु नये.
यारात्री अखंड ज्योत जळावी.
देवी लक्ष्मीला शिंगाडा, मकाणे, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणतेही पदार्थचे नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसाद ग्रहण करते.