kamika ekadashi information in marathi
हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे. आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी(kamika ekadashi) म्हणतात. धर्म शास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करतो, त्याच्याकडून देवता, गंधर्व आणि सूर्य या सर्वांची पूजा होते.
कामिका एकादशी व्रत कथा – कामिका एकादशी(kamika ekadashi katha)
एका गावामध्ये एक वीर क्षात्रीत रहात होता. एका देवाशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मनासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला. आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली. परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही. ब्राह्मणांनी त्याला, तू ब्रह्म हत्येचा दोषी आहेस असे सांगितले. पहिले तू या पापाचे प्रायश्चित घे आणि पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू.
यावर त्या क्षत्रियाने या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला? तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की, आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्रीविष्णूंचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान, दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल. ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले. त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन, तुला ब्रह्म हत्येमधून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले. अशाप्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली.
महत्त्व – कामिका एकादशी(kamika ekadashi importance)
धर्म ग्रंथानुसार कामिका एकादशीचे व्रत महत्त्व स्वतः ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले आहे. त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्य योनी प्राप्त होते. जो व्यक्ती या दिवशी भक्तिपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो, त्याची या संसारातील सर्व पापांमधून मुक्ती होते. जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो त्याचे पितर स्वर्गलोकात अमृतपान करतात. पाप नष्ट करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे.
व्रत विधी – कामिका एकादशी(kamika ekadashi vrat katha)
एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून सोवळ्यात व्हावे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालावे.
त्यानंतर देवाला गंध (अबीर, गुलाल, अत्तर) अक्षता, फुल अर्पण करावे. धूप-दीप लावून आरती करावी.
यानंतर भगवान विष्णूंना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये तुळस अवश्य टाकावी. शेवट क्षमा याचना करून देवाला नमस्कार करावा.
सर्वात शेवटी विष्णू सहस्त्रनामचा पाठ अवश्य करावा आणि भक्तांना प्रसाद वाटावा.
व्रताच्या दिवशी काहीही खाऊ नये. उपवास करावा.
फलाहार करू शकता. पिण्याच्या पाण्यामध्ये तुळस टाकू शकता.
एकादशीला करावा हा उपाय – कामिका एकादशी(kamika ekadashi vrat)
कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर घरातील महिलेने तुळशीची पूजा करून गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करावा. या उपायाने घरामध्ये सुख-शांती कायम राहते आणि सर्व दोष दूर होतात.
मंत्र
महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी
आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।
काय करावे आणि काय करु नये – कामिका एकादशी(kamika ekadashi vrat)
१) सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडु नये, कारण ब्रम्हाडांचे, तसेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक आहे…. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात
२) दाराशी गाय आल्यास तीला पोळी, अन्न, गुळ न देता हाकलू नये – कारण गाय आपले दोष, संकट घेण्यासाठी येते
३) आपले घरातील शिळे अन्न कुत्रे कींवा मुके जनावर यांना जरुर द्यावे. पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते.
४ ) दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडुन पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस, मुके जनावरास पाणी देणे, पाजने हे महद़ पुण्य आहे
५ ) रस्त्यावर वृध्द, अंध, अंपग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरुर करावी, ह्या सारखी पुण्य कमवण्याची संधी नाही
६ ) महीलांनी झाडु व्यवस्थित आडवा ठेवावा, ऊभा ठेवू नये, झाडु लक्ष्मी प्रतिक आहे, त्याचा मान ठेवावा
७ ) मिठ सांडल्यावर त्याचेवर पाय पडु नये म्हणून ते स्वच्छ भरुन पाण्यात टाकावे, मिठ समुद्रात असते, समुद्रापासुन मिळते ,लक्ष्मी समुद्र कन्या आहे, लक्ष्मी आणि मीठाचा फार जवळचा संबंध आहे,
८ ) भर सांयकाळी घरातुन तिन वस्तू कुणाला देवू नये
मिठ, पैसे, झाडू, ह्या वस्तु लक्ष्मी कारक आहे आणि आपण सांयकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणुन तिला घरातून जाऊ देवू नये
९ ) तसेच दुध, दही, आणि ताक ह्या वस्तु गायी पासुन प्राप्त होतात म्हणून ह्या ही लक्ष्मी स्वरूप आहे, त्या वस्तू सांयकाळी कुणास देवू नये (बाहेर काढू नये)
१० ) आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापना ठेवू नये, देव्हार्या जवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरुर असावी, नारळ सोलून कलशावर ठेवावा ,त्यास शेंडी ठेवावी ,उजव्या बाजूला दीपक ठेवावा,
११ )पुर्वी काही घरांमध्ये बहीनीचे, भावांचे कींवा नातेवाईकांचे मुल स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत, नंतर ते मुलं दुकान, शेती ,व्यापारात घरच्या प्रमाणे मदत करीत, अर्धे आयुष्य एकत्र जात असत, काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये, (त्यांचे इच्छे शिवाय) कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते.
१२ ) एकत्र कुटुंबपद्धती मध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देवु नये कींवा विभक्त जाऊन राहू नये
१३ ) घरातील वडीलधार्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी, कुणी आपणास मदत केलीली विसरु नये, कुणाशीही कपट, कारस्थाने वागु नये.
१४ ) सकाळी लवकरच उठावे,महीलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सुर्यनारायणा स पाणी आणि देवाजवळ धुप दीप लावावे, सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा, जसे तुळशीला पाणी, दिवा लावून मग चहा घ्यावा. ,हे सकाळी लवकर करावयाचे कांम, मग दिवसभर आपल्या पद्धतीने कामं करावेत
१५ ) महीला आणि पुरूष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी, थोड्या वेळाने करावयाचे कामं आत्ताच करुन मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाणे वाटणार नाही, रोजचे गृहकृत्य
हे टाळता येत नाही, पण आवड ठेवून झटपट कामं केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआप च शांती ही नांदते
१६ ) वरिल पद्धतीत थोडेफार नियमाचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होन्यासाठी वरिल उपाय खूप महत्त्वाचे आहे…
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
kamika ekadashi full information in marathi