लेख

janmashtami – जन्माष्टमी

janmashtami information in marathi

श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला बुधवारी रात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर झाला. कंसाची बहिण देवकी व वासुदेव यांचा कृष्ण हा आठवा मुलगा होता.  हा दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून कालाविणे म्हणजेच “काला” होय. यालाच दहीकाला असे म्हणतात. या दिवशी दहीकाला करून खाण्याचा प्रघात आहे. श्रीकृष्णाचा हा आवडता खाद्यपदार्थ होता.

हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.


कथा – जन्माष्टमी (krishna janmashtami )

कंस व देवकी ही शूरसेनाची मुले होती. देवकीचे वासुदेवाबरोबर लग्न झाले होते. देवकीच्या मुलांच्या हातूनच तुज मृत्यु होणार आहे. असे भविष्य कंसाला सांगितले होते. म्हणूनच भीतीने कंसाने देवकी आणि वासुदेव यांना तुरुंगात टाकले. देवकीचे प्रत्येक मुल जन्मल्याबरोबरच तो मारून टाकत होता.

देवकीचे आठवे बाळ जन्माला येणार होते एक दिव्य तेज आपल्या उदरात शिरत आहे, असा दृष्टांत देवकीला झाला होता. आठव्या मुलाला मारण्यासाठी कंसाने तयारी केली होतीच. परंतु आठव्या महिन्यात देवकी प्रसूत झाली. रात्री बारा वाजता मुसळधार पाऊस पडत होता. पहारेकरी झोपेत होते. वासुदेव आणि देवकी यांनी हे मुल वाचवायचे ठरवले. वासुदेव यमुना नदी ओलांडून मथुरेला गेला. तेथे नंद हा त्याचा मित्र होता. त्याच्या घरी यशोदेला मुलगी झाली होती. वासुदेवाने आपला मुलगा तेथे ठेवला आणि नंदाची मुलगी घेऊन तो परत आला. कंसाने हि मुलगीहि मारण्याचा प्रयत्न केला; परंतु टी तेजाचे रूप घेऊन आकाशात गेली.

कंसाला “तुझे मरण जवळ आले आहे” असे या शक्तीने सांगितले. इकडे कृष्ण नंदाच्या घरी वाढत होता. वासुदेवाच्या रोहिणी या दुस-या राणीचा मुलगा म्हणजे बलराम होय. श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला असूनदेखील गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये रमला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत वा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुदाम्याबद्दल आपलेपण होते.ह्यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे त्याचे आचरण दिसून येते.

कृष्णाचे गोपाल हे नाव याच अर्थाचे आहे. ‘गो’ म्हणजे गाय. गाईचे पालन करणारा तो गोपाल, असा त्यचा अर्थ आहे.  तसेच माधव, गोपाल, मुकुंद, मुरारी, मधुसादन, श्रीहरी. श्रीकृष्ण ई. अनेक नावांनी ओळखले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे गीता सांगणारा श्रीकृष्ण होय. ज्या संस्कृतीत मर्यादापुरुषोत्तम राम जन्मला त्याच संस्कृतीत श्रीकृष्णासारखा पूर्णपुरुषोत्तम युगपुरुषही जन्माला आला. वैयक्तिक नैतिकता म्हणजे काय ते आपण रामाकडून शिकावे तर सामाजिक एकात्मता म्हणजे काय हे श्रीकृष्णाकडून.

कृष्णाच्या जन्माची कथा तसेच त्याचे संपूर्ण जीवन अदभूत आहे. रामायणाच्या काळात यमुना नदीच्या दक्षिण किना-यावर मधुबन नावाचा सुपीक प्रदेश होता. हा प्रदेश म्हणजेच मथुरा. या ठिकाणी रामाचा बंधू शत्रुघ्न याचे दीर्घकाल राज्य होते. त्यानंतर यादव घराण्याचे राज्य होते.  वासुदेव या यादव घराण्यापैकी एक होय. गोपालन, दुधविक्री हा या यादवांचा मुख्य व्यवसाय होता.


उत्सव साजरा करण्याची पद्धत – जन्माष्टमी (janmashtami krishna)

गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.


दहीकाला/गोपाल काला – श्रीकृष्णा जयंती (krishna jayanthi)

विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. श्रीकृष्णाने  गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करतात. तसेच श्रीकृष्णाला दही-दूध -लोणी असे दुधाचे पदार्थ खूप आवडत आणि पूर्वी ते उंच शिंक्याळ्यात ठेवले जात आणि ते पदार्थ श्रीकृष्ण आपल्या सवंगड्याच्या साथीने एकमेकांच्या खांद्यावर चढून काढत म्हणून दहीहंडी तयार करून ती फोडतात.


कृषी क्रांती

tags:- janmashtami information in marathi

View Comments

  • मला सर्व ग्रंथ पाहीजे आहे माझ फोन नंबर 9664928454