माहिती विडिओ स्वरूपात पहा .


इंदिरा एकादशी व्रत कथा,पितरांसाठी स्वर्ग प्राप्ती :-

चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असलेला पितृपक्ष सुरू आहे. याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते. भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात.

चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असलेला पितृपक्ष सुरू आहे. भाद्रपद महिन्यातील वद्य प्रतिपदा ते अमावास्येचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या कालावधीत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो. पितृदोष करून पूर्वजांचे शुभाशिर्वाद मिळण्यासाठी या पितृपक्ष पंधरवड्यात श्राद्ध विधी केले जातात. याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते. याच दिवशी महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती देखील आहे.

प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्त्व असते. इंदिरा एकादशीच्या व्रताने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि अंतिम समयी मोक्ष प्राप्ती होते. पंचांगानुसार हे व्रत भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. या वर्षी ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी शनिवारी हे व्रत आहे.


इंदिरा एकादशी व्रतकथा :-
एकदा राजा इंद्रसेन याने स्वप्नात आपल्या वडिलांना नरकयातना भोगत आहेत. त्यांना अनन्वित छळ सोसावा लागत आहे, असे पाहिले. या नरकयातनेतून माझी मुक्तता करण्याचा उपाय शोधावा, असे वडिलांनी स्वप्नात सांगितले. राजा इंद्रसेन विचारात पडला. यासंदर्भात त्यांनी देवऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा देवऋषी नारदांनी राजा इंद्रसेनला भाद्रपद महिन्यातील एकादशीला विशेष व्रत आचरण्याविषयी सांगितले. या व्रताचे जे पुण्य मिळेल, ते आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करावे, असे नमूद केले. नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनने मनापासून व्रताचरण केले आणि पुण्य पूर्वजांच्या नावाने दान केले. या व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेन यांचे वडील नरकलोकातून थेट वैंकुठात गेले, अशी कथा पुराणात सांगितली जाते.

इंदिरा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे, असे सांगितले जाते. व्रतदिनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.

सन २०२१ मधील ऑक्टोबर महिना धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पितृपक्षाचा काळ सर्वपित्री अमावस्या समाप्त होऊन नवरात्रोत्सवारंभ होत आहे, सन २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यात गुरुवार, ७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे. तर याच महिन्यात अनेक महत्त्वाचे सण-उत्सव असतील.


इंदिरा एकादशी समाप्त .

View Comments

  • ??।।राम राम माऊली।।नमस्कार।।आपल्या इंदिरा एकादशी सेवेसाठी आणि तसेच सर्व अध्यात्मिक समूहावर दैनंदिन अध्यात्मिक माहिती सेवा प्रस्तुती साठी आपणास कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत।।श्री राम कृष्ण हरि माऊली।।सद्गुरू श्री स्वामी समर्थ नमः।।???️?️?️???