हनुमान जयंती

रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला असल्याने त्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. हनुमानाचा जन्म पहाटे सुर्य उगवतांना झाला असल्याने उगवत्या सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो. हिंदू मान्यतेनुसार संकटमोचन हनुमानाचा जन्म भगवान विष्णूच्या राम अवताराच्या सहकार्यासाठी झाला होता. सीता आणि रावण यांच्यातील युद्धात हनुमानजींनी भगवान श्रीरामांना मदत केली होती. त्या अगोदर रामनवमी साजरी केली जाते. त्यानंतर हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाईल.

हनुमान जयंती हा अंजनीच्या पुत्राचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भक्त उपवास ठेवून हनुमानाची पूजा करतात. पंचांगानुसार या वर्षी हनुमान जयंतीला रवि योग तयार होत आहे. शास्त्रामध्ये हा योग कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. सूर्याच्या विशेष प्रभावामुळे रवि योग हा प्रभावी योग मानला जातो. सूर्याच्या ऊर्जेमुळे या योगात केलेल्या कामात यश मिळते.

हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला. लहानपणापासुनच त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या. एकदा सुर्याकडे आकर्षीत होऊन त्याला गिळण्याकरता हनुमानाने सुर्याकडे कुच केले इंद्रदेवांसह सर्व देव भयभीत झाले इंद्रदेवाने सुर्याला आणि पृथ्वीला वाचवण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले त्यामुळे हनुमंत मुर्चीत झाले, त्यांनतर पवनदेवाने सर्व सृष्टीतील वायू ओढून घेतला त्यामुळे प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आले त्यांनतर सर्व देवतांनी हनुमानाला मुर्चीतेतून बाहेर आणले, त्यांनंतर पवन देव शांत होऊन सुरवातीसारखे वायू पर्यावरणात सोडले, तसेच तेव्हा हनुमानाला सर्व देवतांनी आशिर्वाद देत काही शक्ती प्रदान केल्या. एक दिवस खेळते वेळी हनुमानाने एका ऋषींचा परिहास केला त्यामुळे त्याला शाप दिला ’तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल’.

पुढे प्रभु श्रीरामचंद्र वनवासात असतांना त्यांची आणि हनुमंताची भेट झाली. हनुमानाने प्रभु रामचंद्राना वनवासात आणि युध्दादरम्यान फार मदत केली. हनुमंताच्या आणि वानरसेनेच्या बळावरच रामाने रावणाशी युध्द केले आणि जिंकले देखील.

हनुमान जयंती माहिती समाप्त


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या