लेख

गणेश चतुर्थी

माहिती व्हिडीओ स्वरूपात पहा.


श्री गणेश चतुर्थी हा हिंदूंचा मोठा ण आहे.श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते.

आराध्य देवता बुद्धीचा कारक गणेशाचा जन्मोत्सव म्हणजे गणेश चतुर्थी देशात उत्साहात साजरी केली जाते. पूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो. गणेशोत्सावाच्या 11 दिवसांच्या काळात एक आनंदाचं आणि भक्तीमय वातावरण असतं. महाराष्ट्राबरोबर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये गणेशोत्सवाची धूम पहायला मिळते.

महाराष्ट्रात 10 दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवाची अनुभूती घेण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. रस्त्यावर-चौकाचौकात, गणेश मंडप सजवले जातात. तर दुसरीकडे गणेशभक्त आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात. 10 दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप दिला जातो. काही लोक गणेशोत्सव 2 दिवस साजरा करतात, तर काही लोक पूर्ण 10 दिवस या उत्सवाचा आनंद घेतात. तर, घरगुती गणपतींचं गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जन केलं जातं.

सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, या उद्देशाने श्री गणेशपूजनाशी संबंधित काही कृती आणि त्यांमागील शास्त्र पुढे सांगितले आहे. आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती जाणून घेऊया.


गणेश चतुर्थी व्रत

गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून .

तिचा १ मित्र आहे एक चुहा नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे.


पुराणकथा

पुराणात या सणाची माहिती घेतली असता असे समजते की माता पार्वतीला एकदा स्नानाकरता जायचे असतांना बाहेर कुणी पहारेकरी नसल्याने तिने मातीची एक मुर्ती बनवुन त्यात प्राण फुंकले त्याला पहारेकरी नेमुन ती स्नानाला गेली असता बाहेर भगवान शंकर आले.पहारेकऱ्याने त्यांना रोखले असता त्यांनी संतापुन त्याचा शिरच्छेद केला. माता पार्वती स्नानाहुन आल्यानंतर झालेल्या प्रकाराने ती प्रचंड संतापली आणि क्रोधीत झाली.

तिचा क्रोध शांत करण्याकरता भगवान शंकराने आपल्या सेवकांना प्रथम जे कोणी दिसेल त्याचे शिर आणावयास सांगितले सेवक हत्तीचे शिर घेउन आले असता ते शिर त्या धडावर बसविण्यात आले.तो दिवस भाद्रपद महिन्यातला शुध्द चतुर्थीचा दिवस होता आणि तेंव्हापासुन श्री गणेशाचा उत्सव सुरू होण्याची प्रथा सुरू झाली.भगवान गणेशाला दुर्वा प्रिय असल्याने त्यांच्या शिरावर वाहाण्याची प्रथा आहे.त्याचप्रमाणे नैवैद्यात मोदक अतिप्रीय असल्याने गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात येतो.


गणेश विसर्जन

अनंत चतुर्दशी ला आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जना वेळी प्रत्येक मन भावुक झाल्याचं दिसतं. दहा दिवस एखादा पाहुणा आपल्या घरी यावा आणि दहाव्या दिवशी तो परत निघावा असं होउन जातं.

तो दिवस सगळयांकरताच मोठया जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्याचा आणि कठीण क्षण असतो. पावलं जड होतात . लहानं बच्चेकंपनी तर अक्षरशः रडतांना देखील दृष्टीस पडते.
“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष आसमंतात घुमत असतो. आणि पाठमोरी बाप्पाची मुर्ती पाण्यात जातांना मनात कालवाकालव होते.जो उत्साह त्याच्या आगमनाच्या वेळी मनामनात ओसंडुन वाहात असतो त्याचा लवलेशदेखील त्याला निरोप देतांना आढळुन येत नाही.


गणेश चतुर्थीचं महत्त्व (importance of ganesh chaturthi)

गणेशाचं एक नाव विघ्नहर्ता देखील आहे. असं म्हणतात की, जो गणपतीची मनापासून पूजा करतो त्याच्या आयुष्यातलं सगळे विघ्न गणपती दूर करतो. गणपतीची पूजा केल्याने जीवनात सुख,शांती आणि समृद्धी येते. गणेश चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावं. देवघर स्वच्छ करावं. गणेशाच्या मुर्तीला स्नान घालावं. जास्वदाचं फुल, दुर्वा अर्पण कराव्यात. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मनोभावे गणपतीची आरती करावी.


गणेश चतुर्थी माहिती समाप्त.