christmas natal marathi mahiti
नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.
हे पण वाचा:- भारतातील सर्व सण आणि उत्सवांची माहिती
त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री – नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.
वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ज्या एका अनमोल सुवर्णक्षणासाठी इस्राएली जनता आतुरतेने थांबलेली होती. तो क्षण शेवटी जवळ आला. देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी राहत असलेल्या जोआकिम आणि ॲना या संतद्वयाच्या पोटी एका निष्कलंक कुमारिकेला जन्माला घातले. पवित्र मारियेचा जन्म ही मानवाच्या तारणाची मंगल पहाट होती. अजूनही नीतिमत्तेचा सूर्य जगावर तळपंण्यास अवकाश होता. पुरेश्या वयात आल्यावर जोकिम आणि आन्ना यांनी आपली सुकन्या योसेफ नावाच्या सुताराला दिली. दोघांची सोयरीक झाली. परंतु विवाह समारंभांआधीच मारिया गरोदर असल्याचे दिसून आले. ती पवित्र आत्म्याच्या योगे गर्भवती झाल्याचे स्वप्नातील दर्शनाद्वारे एका दूताने योसेफाला सांगितले. मोठ्या आनंदाने त्याने मारियेला आपली पत्नी म्हणून स्वीकारले.
योगायोगाने त्याच वेळी सीझर आॅगस्टस याने साऱ्या जगाची नावनिशी लिहिली जावी अशी आज्ञा केली. योसेफ हा बेथलेहेम या गावचा असल्याने त्याने आपल्याला वाग्दत्त असलेली मारिया हिलाही आपल्या बरोबर घेतले. तेथे पोहोचल्यावर तिचे दिवस भरले. परंतु सर्व उतारशाळा (धर्मशाळा) भरल्या होत्या. त्यामुळे गाईच्या गोठयात त्यांनी आसरा घेतला. तिथेच मारियेने आपल्या पुत्राला जन्म दिला.
“क्रिसमस” किवा “ नाताळ” हा सण प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत मुळीच अस्तित्वात नव्हता. खरे पाहता पूर्वी येशूजन्माचा उत्सव मागी लोकांच्या आगमनापर्यंत ६ जानेवारी या दिवशी साजरा केला जाई. पौर्वात्य ख्रिस्तसभेमध्ये तिसऱ्या शतकात आणि रोमन ख्रिस्तसभेमध्ये इ. सन ३०० च्या जवळपास नाताळ साजरा करण्यात येऊ लागला. रोम शहरात ही तारीख २५ डिसेंबर अशी ठरविण्यात आली.
परंतु इतरत्र मात्र वेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जाई. रोममधील रोमन लोक सूर्याची देव म्हणून उपासना करीत. २२ डिसेंबरनंतर सूर्याचे दक्षिणायन संपून त्याचे उत्तरायण सुरू होते. व दिवस मोठे होऊ लागतात. रोमन लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार हा सूर्याचा जणू नवीन जन्म असतो. आपल्या देवाचा हा नवजन्म रोमन लोक मोठ्या आनंदाने साजरा करीत. कॉन्स्टन्टाईन या रोमन सम्राटाने याच सुमारास ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्याने ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्याची उपासना न करता सूर्याचा निर्माता आणि नीतिमत्तेचा सूर्य जो प्रभू येशू त्याची उपासना करणे सुरू केले. अशा प्रकारे २५ डिसेंबर हा दिवस रोमन कॅथोलिक ख्रिस्तसभेत येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. सूर्यदेवाच्या वाढदिवसाला रोमन भाषेत “ नातालीज सोलिस इनइक्विटी” म्हणजे अजिंक्य सूर्यदेवाचा वाढदिवस असें म्हणत. त्यावरून या उत्सवाला नाताळ असें नाव पडले.
कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किवा गायीचा गोठा तयार करण्याचा प्रघात आहे. ही परंपरा संत फ्रान्सिस असिसिकर याने १२२३ साली सुरू केली. ग्रेसिओ नावाच्या एका लहान गावाजवळ असलेल्या गुहेमध्ये त्याने खरी गाय, उंट, मेंढरे, गाढवे इ. आणून असा देखावा निर्माण केला. त्याद्वारे लोकांना देवाच्या अपार दयेची व ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली. ही प्रथा गावातील लोकांनी पूर्वापार पाळत ठेवली.
असे म्हणतात की त्या वेळी संत फ्रान्सिस याने पवित्र मिस्सा अर्पण केली व लोकांना भावस्पर्शी प्रवचन दिले. त्या प्रवचनाच्या शेवटी या संताच्या हातात खरोखरच एक जिवंत बालक अवतरल्याचे लोकांनी पहिले. त्यामुळे गोशाळा उभारण्याच्या प्रथेला आणखी बळकटी मिळाली. अकराव्या व बाराव्या शतकात ख्रिसमस कॅराॅल किवा नाताळ गीतांची प्रथा जर्मनीत सुरू झाली. दहाव्या शतकात ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सुरू झाली. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे. ख्रिसमस ट्रीचा अधिक सविस्तर उल्लेख १६०५मध्ये आढळतो.
नाताळ किंवा क्रिसमसची संपूर्ण माहिती आणि इतिहास 2021 समाप्त
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
View Comments
छान माहिती
ख्रिसमस नाताळ निबंध,माहिती नक्की बघा.