बुद्ध पौर्णिमा
बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.
बुद्ध जयंतीचे महत्त्व
जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे
करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
आरंभीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी (ज्ञान) प्राप्त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळविण्याकरिता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले
हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास नाही. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, याचे स्पष्टीकण करणारी कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.
बुद्ध पौर्णिमेला सू्र्य मेष राशीत तर चंद्र तूळ राशीत प्रवेश करतो. या दिवशी गंगेत केलेले स्नान पवित्र मानले जाते. गंगेत स्नान केल्याने गेल्या जन्मातील कुकर्मातून मुक्ती मिळते, असा समज आहे.
बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्य आचरणात आणल्यास माणूस त्याचं जीवन आनंदात घालवू शकतो. ती सत्य म्हणजे…
> दु:ख असते.
> दु:खाला कारण असते.
> दु:खाचे निवारण करता येते.
> दु:ख कमी करण्याचे उपाय आहेत.
बुद्धांनी आठ मार्ग सांगितले
दु:ख निवारण्यासाठी बुद्धांनी आठ मार्ग सांगितले होते.
> यम
> नियम
> आसन
> प्राणायाम
> प्रत्याहार
> ध्यान
> धारणा
> समाधी
बुद्ध हे विष्णूंचे नववे अवतार
बौद्ध धर्मीयांबरोबच हिंदूंसाठीही ही तिथी तितकीच महत्त्वाची आहे. पौराणिक कथेनुसार पौर्णिमा भगवान विष्णूशी जोडली गेलेली आहे. तसेच भागवत पुराणानुसार बुद्ध हे विष्णूचे नववे अवतार मानले जातात.
सत्यविनायक पौर्णिमा
हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला ‘सत्यविनायक पौर्णिमा’ म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या मित्राला सुदाम्याला गरिबी आणि दु:खातून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यविनायकाचा उपवास करण्यास सांगितले होते.
बुद्ध पौर्णिमा
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी धर्मराजाचीही पूजा केली जाते.
budhha he vishnu che 9 ve awtar nahi
ani kontyahi nadicha panyat anghod kelya ne pap mukt hot nhi pap mukt krnya sathi man mukt pahije ani te panyane swach hot nhi
गौतम बुद्ध हे दुःखाचे मूळ करण शोधण्यासाठी आपले घर दार, राज्य सोडून, पत्नी व मुले,सर्व कुटुंबाचा त्याग करून रातोरात घराबाहेर पडले होते याबाबत मला माहिती होते पण ते हिन्दू धर्मातील विष्णुचे नववे अवतार आहेत/होते हे न पटपटण्यासारखे आहे, कारण बुद्धाचा कालावधी आता कुठे अडीच तीन हजार वर्षाचा होत असेल तर ते 5000-10000 वर्षाचा असणाऱ्या हिंदू धर्मातील देवतांचे (विष्णुदेवाचे) नववे अवतार कसे असतील याबाबत शंका वाटतेय, कोणी खुलासा करेल का?
बौद्ध धर्म हा विज्ञानवादी म्हणजेच वास्तवदर्शी आहे व त्यात देवा धर्माचा कोठेच उल्लेख नाही.
तरी पण त्यांना विषाणूचा नववा अवतार कसे मानले जाते त्याबाबत कोणी पटण्याजोगे खुलासा करेल का?
mr bhalerao please contemplate on pratitya samutpad then you’ll come to know the truth of indic thought.
Buddha is nirgun nirakar,in this sense the word avatar is used.That is the evolution of the intelligence. Siddhata gotama is different part.
This interpretation is for Mr. bhalerao.