आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची) देवशयनी आषाढी एकादशी (ashadhi ekadashi)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.
भारतीय संस्कृतीत सन्मार्गांने वागावे, सत्याचरण करावे यासाठी मानवास विविध व्रते करण्यात सांगितले आहे. आपल्या मनातील अशुभ विचारांचे पदोपदी मानवी मनावर आक्रमण होत असते हे कोणी नाकारु शकत नाही. मानव व पशु यातील महत्त्वाचा फरक निती अनितीचे परिक्षण करणारी बुद्धि हाच म्हणावा लागेल. ” परोपकाराय पुण्याय ” हा जागतिक सिद्धांत महर्षी व्यासांनी मांडल्याचे आपण जाणतोच, मात्र त्यानुसार आचरण ही कर्मकठीण गोष्ट आहे.
याची कमीअधिक प्रचिती प्रत्येकास येतच असते. आपणास प्रयत्नपुर्वक या सन्मार्गदायक महासुत्राचे आचरण करावयाचे असेल तर मन नावाचे इंद्रिय आज्ञेत असणे अत्यावश्यक म्हणावे लागेल. आपल्या प्रत्येक धर्मानुष्ठानाचे उच्चतम ध्येय मनाची स्वभाविक चंचलता कमी करुन सरावाने मनोनिग्रह करणे हेच आहे.
उपनिषदांचे मत शरीर रथ, इन्द्रिय घोडे व मन लगाम आहे , त्यामुळे मनावर नियंत्रण यशाचा राजमार्गच म्हणावा लागेल. दहा इन्द्रियांनंतर मनास अकरावे इन्द्रिय म्हणून शास्त्राने मान्यता दिली आहे, म्हणून एकादशीस ( अकराव्या तिथीस) भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. मनावर अंकुश ठेवायचा असेल तर त्यादृष्टीने एकादशीस व्रत करणे फलदायी ठरते. आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा ते मूलतः काम्यव्रत असते म्हणजे उत्तम नोकरी, व्यावसायिक प्रगती , सांसारीक सुख हा प्रामुख्याने हेतु असतो.
व अशाप्रकारची व्रते ऐच्छिक असतात ती कोणी निसर्गतः स्वीकारत नसतो. उदिष्ठपुर्तीसाठी दैवीउपासना हे त्यांचे लक्ष असते. मात्र एकादशी व्रत हे श्वासोश्वास करणा-या मानवाने जाणीवपूर्वक आपल्या सर्वांगिण प्रगतीसाठी करावे असे सांगितले आहे. उपवास व हरिस्मरण हा या व्रताचा मुख्य भाग आहे.
आहारशास्त्राचा विचार केला तर लंघन करणे हे शरीरास आरोग्यदायक ठरते, जसे शरीराचे आरोग्य आवश्यक आहे तसेच मनास सामर्थ्यसंपन्न करण्यासाठी एकादशीस हरिस्मरण करणे हितकारक ठरते. एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर दशमीच्या रात्री उपवास सुरु करुन एकादशीस पूर्ण दिवस उपवास करुन व्दादशीस महानैवेद्य दाखवून उपास सोडावा.
प्रातःस्मरणीय तुकाराम महाराजांचे एकादशी संदर्भातील पुढिल अभंग या संदर्भात प्रेरणादायी आहेत-
एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन ।
श्वानविष्ठेसमान । अधम जन तो एक ॥
ऎका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन ।
गाती ऎकती हरिकिर्तन । ते समान विष्णूशी ॥
अशुद्ध विटालशींचे खळ । विडा भक्षिंती तांबूल।
सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥
शेज बाज विलास भोग । करि कामिनीशीं संग ।
तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥
आपण न वजे हरिकिर्तन। आणिकां वारी जातां जन ।
त्याच्या पापा जाणा । ठेंगणा महामेरु तो ॥
तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥
एकादशीचे व्रतमाहात्म्य वर्णन करताना अत्यंत गुह्यतम व्रत सुलभपणे सांगून उच्चतम फलप्राप्तीची खात्री या अभंगातून दिली आहे. नर का नारायण होण्यास सांगणारा धर्मसिद्धांत केवळ उपवास व हरिकिर्तनाने साध्य होईल अशी ग्वाही महाराज देतात.
ना कोणता यज्ञ, ना वेद पठण, ना मोठी खर्चीक अनुष्ठाने, ना कठोर व्रताचरण, ना हटयोग ना विद्वत्तेचे जाहिर प्रदर्शन तरी देखील “नर का नारायण” होणे सहज साध्य असल्याचे महाराज सांगतात.
श्रीविठ्ठला बद्दल निरपेक्ष प्रेमभाव हे असाधारण बळ प्रदान करणारे ठरते. आषाढी एकादशीला लाखो लोक विठोबाचे दर्शन घेण्यास मंगलमय वारीत सहभागी होतात. त्याचे एकमात्र कारण विठठलाचे प्रेमस्वरुप नाम ॥विठोबाचे नाम सुलभ सोपारे। तारी एकसरें भवसिंधु॥ येणा-या प्रत्येकावर समानभावाने प्रेमकरणारा व भवसिंधु तरुन जाण्यास तळमळीने साह्यभुत होणारा विठठल हाच सकालांचा आधार ठरतो. हरिस्मरण हाच मुख्य धर्म आहे असे मानणे, व त्यानुसार आचरण करणे मानवास सात्विक बनवते.
अशा हरिभक्ताच्या मनातील हरिचिंतनाची सहजस्पंदनाने भूमंडलातील अमंगलाचे अघमर्षण व मांगल्याचे प्रक्षेपण करत असते आणि तेही निरपेक्ष आणि अविरत. कलीयुगात अशा ज्ञातअज्ञात हरिभक्तांच्या पुण्यप्रभावानेच सन्मार्गाने जाणा-यांना अपयशाच्या महाद्वारात उभे राहूनही हरिनिष्ठ राहण्याचे अभेद्य बळ मिळत असते.
यशापयशाच्या आलेखावरुन आपल्या भक्तिचे किंवा इश्वरीकृपेचे मुल्यांकन आपण करु शकत नाही. मनातील असंतुलीत आंदोलने, अनामिक भय, सर्वसाधनसंपत्तीने सालंकृत असूनही निद्रादेवीची अवकृपा व सतत असमाधानाचे बीजारोपण, या लक्षणांच्या यादीत चढत्या भाजणीने होणारी वाढ थांबवणे हे आपले उदिष्ठ असणे अगत्याचे आहे. कारण विठठलाचे स्वरुप तर शांताकारम् आहे. आम्ही अल्पसंतुष्ट मनोवृत्तीचा पुरस्कार करत आहोत असे कदापि समजू नये. नित्यस्पर्धेतील सर्वोत्तम स्पर्धक अशी आपली ख्याती जरुर असावी, मात्र त्याच बरोबर शाश्वत सर्वोत्तमाचा ध्यासही घ्यावा. आणि त्यासाठी आषाढी एकादशी हा अत्युत्तम मुहूर्त आहे हे वेगळे सांगावयास नको.
‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.
आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते.
कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे.
आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपोषण करायचे. रात्री हरिभजनात जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.
चातुर्मासाची सुरुवात आषाढ शु। एकादशीने होते. एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमधे प्रत्येकामधील सात्त्विकता सर्वात अधिक असते. त्यामुळे या दिवशी साधनाकरण अधिक सोपे जाते आणि साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो.
सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी. तिचं महात्म्य असं आहे.
वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीेभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो। भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. जी व्यक्तीग अजिबात साधना करत नाही अशा व्यक्तीतला ईश्वजरोपासनेकडे वळण्यासाठी व्रते खूप महत्त्वाची आहेत.
पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी’ म्हणण्याचे कारण : मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात.
आषाढी एकादशीचे महत्त्व : देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तीं पासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. या आषाढी एकादशीचे महत्त्व खुप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो, अशी वारक-यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारक-यांचादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आषाढ महिना म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पंढरपूरच्या वारीचा काळ असतो. आषाढी एकादाशीच्या दिवशी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचतात. त्यांसोबत लक्षावधी लोक अनेक दिंड्यातून पायी चालत, विठोबाचे वारकरी म्हणून मोठ्या श्रद्धेने पंढरीला पोहोचतात.
वारकर्यांलत जात, पंथ, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा जराही भेदभाव नसतो. इसवी सन १२९१ मध्ये आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी पहिली दिंडी निघाली होती असे म्हटले जाते. या वारीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही विठ्ठलभक्त नियमितपणे दिंडीत सामील होतात. वारकरी लाखोंच्या संख्येने विठ्ठलनामाचा गजर, भजन- प्रवचन-कीर्तन करत पायी चालतात.
असंख्य तरुणही त्यात हौसेने व भक्तिभावाने सामील होतात. परदेशी लोकही मुद्दाम या सुमाराला ही विठ्ठलभक्तीची वारी पाहण्यासाठी भारतात येतात आणि या अनोख्या परंपरेचा अनुभव घेतात.
गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध-टिळा-बुक्का आणि तोंडाने विठुनामाचा गजर करणारे हे वारकरी खांद्यावर पताका, हातात टाळ, डोक्यावर तुळस घेऊनही चालतात. अनेकांच्या गळ्यात मृदंगही असतो. वर्षानुवर्षे वारीला जाणारे लाखो लोक निग्रहाने चालतात, वाटेत होईल तशी विश्रांती घेतात, मिळेल ते जेवण-खाण घेतात. वारीचे, विविध पालख्यांचे प्रवास-निवास-भोजन यांचे वेळापत्रक, व्यवस्थापन हाही एक अनुभवण्याचा विषय आहे. आषाढातील ही एकादशी उपवास करून घरोघरी साजरी होते. पावसाळ्याची सुरुवात असल्याने ताजी रताळी, नवा बटाटा, खजूर, फळे, वर्यानचे तांदूळ, खिचडी असे विविध उपवासाचे पदार्थ या दिवशी ग्रहण केले जातात.
या एकादशीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्र्वरांची, देहूतून संत तुकाराम, त्र्यंबकेश्र्वरहून संत निवृत्तीनाथ, सासवडहून सोपान देवांची, पैठणहून संत एकनाथंची, मेहूणहून संत मुक्ताबाईंची, औंढ्या नागनाथहून संत विसोबा खेचरांची, तेरहून संत गोरा कुंभारांची – अशा अनेक पालख्या पंढरपूरला जायला निघतात. संत ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला निघते. ती आषाढ शुक्ल दशमीला रात्री पंढरपूरला पाहोचते.
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या