संत एकनाथ महाराज

संत एकनाथ महाराज: गौळणी

संत एकनाथ महाराज: गौळणी

गौळण १

तुझ्या मुरलीची ध्वनी | अकल्पित पडली कानीं |
विव्हळ झालें अंत:करणी | मी घरधंदा विसरलें ||१||
अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ||धृ||
मुरली नोहे केवळ बाण | तिनें हरिला माझा प्राण |
संसार केला दाणादीन | येऊनि हृदयी संचरीली ||३||
तुझ्या मुरलीचा सूरतान | मी विसरलें देहभान |
घर सोडोनी धरिलें रान | मी वृंदावना गेलें ||४||
एका जनार्दनीं गोविंदा | पतितपावन परमानंदा |
तुझ्या नामाचा मज धंदा | वृत्ति तंव पदीं निवर्तली ||५||

गौळण २

चुराचुराकर माखन खाया । गवलन का नंद कुमर कन्हैया ||१||
काहे बराई दिखावत मोही । जानत हुं प्रभूपणा तेरा सब ही ||धृ||
और मात सुन उखलसुं गला । बांधलिया आपना गोपाला ||३||
फिरत बनबन गाऊ धरावत । कहे तुकयाबंधू लकरी लेले हात ||४||

गौळण ३

हरि तुझी कांती रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी ।
तुझ्या दर्शने होईन काळी । मग हे वाळी जन मज ||१||
उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगो रे गोवळा ।
तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ||धृ||
तुझिये अंगी घुरट घाणी । बहू खासी दूध तूप लोणी ।
घरिचे बाहेरिल आणोनि । मी रे चांदणी सुकुमार ||३||
मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन ।
अंगीचे तुझे देखोनि लक्षण । मग विटंबना होईल रे ||४||
तुज तंव लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही ।
आणिक मात बोलु काही । कसी भीड नाही तुज माझी ||५||
वचन मोडी नेदि हात । कळले न साहेचि मात ।
तुकयास्वामी गोपिनाथ । जीवन्मुक्त करुनि भोगी ||६||

गौळण ४

विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ||१||
एकांती एकल्या एकाच सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्याला ||२||
तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परि चोरी आंरभिली ||३||
कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्याही येथे नका आम्हापाशी ||४||
बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । त्या चोरोनि तिहीं खेट केली ||५||
भेऊनियां जना एकींसवा झाल्या । वाती विझविल्या दाटो बळे ||६||
कृष्णसुख नाहीं कळले मानसी । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ||७||
तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । म्हणुऊनि समेळ मेळविला ||८||
अंतरीं कोमळा बाहेरि निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानी ||९||
हरिरुपी दृष्टी कानी त्याची गोष्टी । आळगिती कंठी एकाएकी ||१०||
न साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ||११||
विसरल्या मागे गृह सुत पति । अवस्था याचिती गोविंदाची ||१२||
अवस्था लागोनि निवळचि ठेल्या । एकाएकी झाल्या कृष्णरुपा ||१३||
कृष्ण म्हणुनवुनी देती आलिंगन । विरहताप तेणे निवारेना ||१४||
ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनी न देखता ||१५||
न देखता त्यांचे प्राण रिघो पाहे । आजि कामा सये ऊशिर केला ||१६||
रित्या ज्ञानगोष्टी तया नावडती । आलिंगन प्रिती कृष्णाचिया ||१७||
मागे आम्ही काहीं चुकलो त्याची सेवा । असेल या देवा राग आला ||१८||
आठविति मागे पापपुण्य दोष । परिहार एकिस एक देती ||१९||
अनुतापे झाल्या संतप्त त्या बाळा । टाकिती विव्हळा धरिणी अंग ||२०||
जाणोनि चरित्र जवळिच होता । आली त्या अनंता कृपा मग ||२१||
होउनि प्रगट दाखविले रुप । तापत्रयताप निवविले ||२२||
निवाल्या देखोनि कृष्णाचे श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला ||२३||
साच भाव त्यांचा आणुनिया मना । आळंगिती राणा वैकुंठिचा ||२४||
हरिअंगसंगे हरिरुप झाल्या । बोलो विसरल्या तया सुखा ||२५||
व्याभिचारभावे भोगिले अनंता । वर्तोनि असता घराचारी ||२६||
सकळा चोरोनि हरि जया चित्ती । धन्य त्या नांदती तयामध्ये ||२७||
उणे पुरे त्यांचे पडो नेदी कांही । राखे सर्वाठायी देव तया ||२८||
न कळे लाघव ब्रह्मादिकां माव । भक्तिभावे देव केला तैसा ||२९||
तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार । साधिले अपार निजसुख ||३०||

गौळण ५

 

हे पण वाचा: संत एकनाथ हरिपाठ

 

चुराचुराकर माखन खाया । गवलन का नंद कुमर कन्हैया ||१||
काहे बराई दिखावत मोही । जानत हुं प्रभूपणा तेरा सब ही ||धृ||
और मात सुन उखलसुं गला । बांधलिया आपना गोपाला ||३||
फिरत बनबन गाऊ धरावत । कहे तुकयाबंधू लकरी लेले हात ||४||

गौळण ६

मस्तकीं ठेवोनियां डेरा | करुं निघाली विकरा |
साच करीतसे पुकारा | म्हणे गोविंद घ्या वो ||धृ||
बोल बोलती आबळा | तंव त्या हांसती सकळा |
मुखीं पडियेला चाळा | तो गोपाळाचा ||२||
दहीं म्हणावेंसें ठेलें | वाचे गोविंद पैं आलें |
चित्त चैतन्य रंगलें | कान्हु चरणीं बाई वो ||३||
उन्नतीये बोलती नेती | चालता गजगती |
कान्हु वांचूनी चित्तीं | आणिक नेणें बाई वो ||४||
जाऊनियां बळीच्या द्वारा | त्रिपांड केली वसुंधरा |
कैसा सामावला तुमच्या डेरा | दाखवी बाई वो ||५||
वृद्ध गौळणी पाचारिती | आणी वो अरुता श्रीपती |
कोठे गोविंद विकिती | नाहीं देखियेला बाई वो ||६||
श्रीरंगी रंगला जीवू | म्हणे घ्या वो हा माधवु |
बरवा रमापती गौरवु | साच आणियेला कैसा ||७||
बाळा भरूनियां बाळा | देखें श्रीरंगु सांवळा |
वेधी वेधल्या सकळां | गोपी गोविंदासवें ||८||
गोविंद गोविंद म्हणा वाचें | गोविंद स्मरण करा साचें |
दोष हरती जन्माचे | छंद लागला तयाचा ||९||
नामया स्वामी हो मुरारी | मज पाहतां अभ्यंतरी |
रोखी व्यापिलें निर्धारीं | मनुष्यपण ||१०||

गौळण ७

गेलीया वृंदावना तेथें देखिला कान्हा |
सवंगडीया माजीं उभा ध्यान लागलें मना ||१||
हरीनाम गोड झालें काय सांगो गे माय |
गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ||धृ||
त्याचें मुख साजिरें वो कुंडलें चित्त चोरें |
सांडूनी अमृत धणी लुब्धली चकोरे ||३||
सांडूनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा |
कौस्तुभा तळवटी वैजयंती शोभे गळां ||४||
सांडूनी मेघराजू कटीसूत्री तळपे विजू |
भुलला चतुरानन तया नव्हे उमजू ||५||
सांडूनि लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज |
अचोज हा चोजवेना ब्रम्हदिकां सहज ||६||
वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू |
भेदली हरिचरणी पायीं मुरडीव वांकी सोज्वळु ||७||
त्याचें पायींची नुपुरें वाजती वो गंभीरे |
लुब्धलिया पक्षी याती धेनू पाचारी स्वरे ||८||

गौळण ८

यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ||धृ||
साध्या गव्हाची पोळी लाटी | मला पुरणपोळी करून दे मोठी |
नाहीं अडवित गुळासाठी | मला जेवूं घाल ||२||
तूप लावून भाकर करी | वांगे भाजून भरीत करी |
वर कांद्याची कोशिंबिरी | मला जेवूं घाल ||३||
आई गे खडीसाखरेचे खडे | लवकर मला करून दे वडे |
बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे | मला जेवूं घाल ||४||
आई लहानचं घे गे उंडा | लवकर भाजून दे मांडा |
लांब गेल्या गाईच्या झुंडा | मला जेवूं घाल ||५||
आई मी खाईन शिळा घाटा | दह्याचा करून दे मठ्ठा |
नाहीं माझ्या अंगीं ताठा | मला जेवूं घाल ||६||
भाकर बरीच गोड झाली | भक्षुनी भूक हरपली |
यशोदेने कृपा केली | मला जेवूं घाल ||७||
आई मी तुझा एकुलता एक | गाई राखितो नऊ लाख |
गाई राखुनी झिजली नखं | मला जेवूं घाल ||८||
नामा विनवी केशवासी | गाई राखितो वनासी |
जाऊन सांगा यशोदेसी | मला जेवूं घाल ||९||

गौळण ९

ध्यान सांवळे गोकुळींचे | धांव पाव वेगीं हरी सांवळीया ||धृ||
सांवळीसी अंगी उटी | सांवळी कस्तुरी लल्लाटीं |
सांवळीसी कांसे कासियला कटीं | गोवळीया ||२||
सांवळीसी तनु बरवी | सांवळे वृंदावन मिरवी |
सांवळ्याशा तुळसी कानी | मंजुरीया कोंवळीया ||३||
सांवळीसी कंठी माळा | सांवळे हृदयी पदक विशाळा |
सांवळ्याशा गोपी केल्या ओवळ्या | गोंवळीया ||४||
सांवळीशी हाती काठी | सांवळासा कांबळा पाठीं |
नामयाचा स्वामी गायी राखी | धवळ्या आणि पिवळ्या ||५||

गौळण १०

सोडी कान्हा रवि दोर माथिल्या देतें | बया मज तें दे आई मज तें दें | डेरां घुमघुमतें ||धृ||
यशोदा उचलोनि | कडे त्यासी घेऊनि | दाविती चित्रशाळेतें ||२||
करीं कर धरोनि | नेऊनि अंगणी | दावी कूप बावीतें ||३||
दावित आरशांत | म्हणें पाहें कृष्णनाथ | मुखमुखा चुंबिते ||४||
चिमण्या ह्या गौळणी | आल्या त्याही मिळोनी | राधे उरी मज तें दें ||५||
राधेसी म्हणे नामा | कृष्णासी तुझा प्रेमा | समजवियासी तें दें ||६||


कृषी क्रांती 

संत एकनाथ महाराज: गौळणी संत एकनाथ महाराज: गौळणी