संत एकनाथ

संत एकनाथ कविता 

संत एकनाथ कविता 

कविता ज्ञानियाचा एका

ज्ञानियाचा एका बोल हे ऐकता । ठेवितो मी माथा तुझ्या पायी ॥१॥
ज्ञानाईने तुला सांगताच स्वप्नी । आलास धावुनी आळंदीस ॥२॥
तूच एक पुत्र खरा श्रद्धावंत । माऊलीचे आर्त जाणणारा ॥३॥
नंदिद्वारातून प्रवेशसी आत । माय कॄपावंत पाहिलीस ॥४॥
कंठी रुतलेली अजानाची मुळी । काढून तू माऊली मुक्‍त केली ॥५॥
पान्हावून तिने पोटाशी धरिले । आपलेसे केले त्याच क्षणी ॥६॥
ज्ञानेश्वरी ग्रंथ मूळचाच शुद्ध । पाठांतरी अबद्ध होता झाला ॥७॥
तिच्याच आज्ञेने करुनि प्रतिशुद्ध ।आमच्या हातात दिलास तू ॥८॥
भाव धरुनिया वाचा ज्ञानेश्वरी । मंत्र हा वैश्‍वरी तूच दिला ॥९॥
तुझे हे वचन मानुन प्रमाण । अहो रात्र पठण केले आम्ही ॥१०॥
वाचता वाचता भेटला श्रीहरि । अमॄत अक्षरी लपलेला ॥११॥
हंसगीत म्हणे आला अनुभव । श्रीहरि ज्ञानदेव दोन्ही एक ॥१२॥

हे पण वाचा: संत एकनाथ आरती 


कृषी क्रांती 

संत एकनाथ कविता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *