भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्र्याऐंशिवा
श्रीरामांना राज्याभिषेक –
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
धन्य तो वाल्मीकिमुनिजन । धन्य धन्य त्याचें वचन ।
अनागत रामायण । केलें-निरूपण शतकोटी ॥ १ ॥
धन्य तें अयोध्याभुवन । धन्य धन्य तेथींचे जन ।
धन्य तयांचे नयन । नित्य रघुनंदन देखती ॥ २ ॥
धन्य भाग्य त्या भरताचें । नित्य चिंतन श्रीरामाचें ।
प्रेम देखोनि निष्कर्षाचें । झालें स्वामीचें आगमन ॥ ३ ॥
रामराज्याभिषेकासाठी आलेल्यांची नामावली :
त्याच्या राज्याचा उत्साहो । अभिषेकी कळवळलाहो ।
भरतें मांडिला पहा हो । ऋषिसमुदावो मेळवोनी ॥ ४ ॥
श्रीरामराज्याभिषिंचन । पाहूं आले सुरगण ।
मरुद्गणेंसी पाकशासन । स्वयें आपण तेथें आला ॥ ५ ॥
देवगुरु बृहस्पती । तेथे आला शीघ्रगतीं ।
सनकादिक मुनिपंक्ती । उडी अवचितीं तेथे आली ॥ ६ ॥
लुक वामदेव नारद । दत्तात्रेयादि महासिद्ध ।
धुव उपमन्ह प्रल्हाद । भक्तवृंद पातले ॥७ ॥
तुंबुरादिक गंधर्व । तेथें पातले स्वयमेव ।
अष्टनायिका घेवोनि धांव । नृत्यगौरव मांडिलें ॥ ८ ॥
नित्य लोकपाळ समुदायेंसीं । भेटों आले उपायनेंसीं ।
यत्र गंधर्व चारणेंसीं । थाट अयोध्येसीं दाटले ॥ ९ ॥
अष्टमहासिद्धींसमवेत । सुस्वर सामवेद गर्जत ।
घेवोनि ब्रह्मा आला तेथ । श्रीरघुनाथ पहावया ॥ १० ॥
निजध्येय श्रीरघुनंदन । ऐकोनि त्याचें अभिषिंचन ।
गणसमुदायेंसीं धांवोन । त्रिनयन तेथें आला ॥ ११ ॥
सांडोनियां शेषशयन । विचित्र रत्नें बळिदान ।
घेवोनि आला जनार्दन । श्रीरघुनंदनदर्शना ॥ १२ ॥
जलचर स्थळचर खेचर । दानव मानव वनचर ।
त्रैलोक्यांतील चराचर । पाहूं रघुवीर पातले ॥ १३ ॥
श्रीराम तीर्थां तीर्थपीठ । त्यासी होतां राज्यपट ।
पाहूं आले तेथीचा थाट । त्यांहीं शरयूतट बसविलें ॥ १४ ॥
वक्री अतिचार होवोनि पूर्ण । सत्वर पातले ग्रहगण ।
श्रीरामराज्याभिषिंचन । पहावया जाण आनंदें ॥ १५ ॥
रावणाच्या पायांतळीं । होते लोळत मंचकाजवळी ।
रामें सोडविले तत्काळीं । त्याची राज्यशैली पाहो आले ॥ १६ ॥
अयोध्येतील उत्साह :
अयोध्येच्या चौपासीं । विमानें दाटली आकाशीं ।
नगरी ठाव नाहीं वस्तीसी । थाटे ऐसीं दाटलीं ॥ १७ ॥
मंदार कल्पतरु संतान । घरोघरीं त्यांचेनि वन ।
सुरवर सुमनसिंचन । बिदोबिदीं जाण घालिती ॥ १८ ॥
घरोघरी मंगलार्चनें । दीपावळी नीरांजनें ।
गुढिया मखरें तोरणे । श्रीरघुनंदननिजोत्सवा ॥ १९ ॥
हाड। हटवटिया चौबारें । कथाकीर्तन चौफेरे ।
गात रामकर्तिन गजरें । अंबर झरे तुषारीं ॥ २० ॥
वसिल्या भक्तीच्या पेठा । आनंदकीर्तन चौहटां ।
सांदीबिदीं राजवाटा । सुकाळ मोठा नामाचा ॥ २१ ॥
शेट महाजन वेव्हारे । श्रीरामागमनसुखीरें ।
उदीम करिती अत्यादरें । लाभ निर्धारें श्रीराम ॥ २२ ॥
राम टके खरें नाणे । एकी मोहरा देणें घेणें ।
अक्षसं रसाचें त्याचें निजकेणें । सवदा करणे निजसत्ता ॥ २३ ॥
द्वैत दलालाची ओढी । नाही मापारियाची सांकडी ।
आपुलाल्या निजवडीं । द्यावया गाडी निजवस्तु ॥ २४ ॥
राममुद्रावस्तूवरी । आख घालोनि साटीकरीं ।
देतां घेतां सुखचि वरी । उदीम भारी चालत ॥ २५ ॥
भरत वसिष्ठांकडे अभिषेक -सामग्रीची विचारणा करतो :
येरीकडे वीर भरत । श्रीरामप्रेमें अत्यद्भुत ।
सस्तुरूसी शरणागत । होवोनि पुसत सामग्री ॥ २६ ॥
श्रीरामाभिषेकसामग्री । स्वामी सांगावी झडकरी ।
कोण पदार्थ कैसिये परी । निजनिर्धारीं आज्ञापी ॥ २७ ॥
देखोनि भरताच्या प्रेमासी । अत्यंत सुख वसिष्ठासी ।
प्रीतीं धरोनि पोटेंसीं । निजहृदयेंसीं आलिंगिला ॥ २८ ॥
वसिष्ठकृत भरतप्रशंसा :
भरता तुझें भाग्य गहन । भरता तुझी भक्ति धन्य ।
भरता तुझें प्रेम धन्य । भाव धन्य तुझा भरता ॥ २९ ॥
श्रीरामाचें भजनसुख । तुवांचि सेविलें सम्यक ।
भजनमर्यादा अति नेटक । आचार्यत्वें देख प्रकाशिली ॥ ३० ॥
भरत भक्तीचें भांडार । भरत भक्तीचें निजसार ।
भरत भक्तीचें माहेर । भरतें उद्धार भक्तीचा ॥ ३१ ॥
म्हणोनि दिधलें आलिंगन । प्रीतीकरोनि मुखचुंबन ।
शास्वविधी निजलक्षण । सामग्री पूर्ण अभिषेका ॥ ३२ ॥
सर्वज्ञ ज्ञाता तूं होसी । विधिपाळण करूं आलासी ।
तरी पूर्वीच रामसिद्धीसी । तुझपासी उषदेशिलें ॥ ३३ ॥
मानसोपचारच प्रत्यक्ष रूपाने आणवून अभिषेक करावा अशी श्रीवसिष्टांची भरताला आज्ञा :
तेणें अनुक्रमें जाण । तुवां करितां आराधन ।
अंतर्योग सुलक्षण । जेणें रघुनंदन भेटला ॥ ३४ ॥
जे केले मानसोपचार । तेचि प्रत्यक्ष साचार ।
मेळवोनि वेगवत्तर । श्रीरघुवीर अभिषेकीं ॥ ३५ ॥
लाहोनि सद्गुरूआज्ञापन । करोनि साष्टांगी नमन ।
जेथें सुग्रीव बिभीषण । तेथें ठाकून पे आला ॥ ३६ ॥
तस्य तद्वचनं शृत्वा भरत: सत्यविळमः ।
पाणी जजाह सुग्रीवं प्रविवेश ततो गृहम् ॥ १ ॥
भरत सुग्रीव-बिभीषणाच्या भवनाला आला :
श्रीरामाचे निजगण । सुग्रीवादि बिभीषण ।
श्रीरामभवनासमान । स्थानें नेमून तयां दिधली ॥ ३७ ॥
ज्यांचिया निजभवनांसी । सत्यकीर्ति सत्वराशी ।
भरत रामाभिषेकासी । पुसों विचारासी तेथें आला ॥ ३८ ॥
धरोनि सुग्रीवाचा हात । प्रवेशला भवनाआंत ।
एकासनीं आसनस्थ । निजवृत्तांत सांगत ॥ ३९ ॥
पित्राज्ञा अति दुस्तर । पाळावया रघुवीर ।
व्रतें धरिलीं दुर्धर । जी दुस्तर सुरसिद्धां ॥ ४० ॥
धरितां न धरवती मानसी । ऐकतो चळकांप चित्तासी ।
तीं आचरला वनवासीं । झालीं जगासी सुखकारी ॥ ४१ ॥
निवटोनियां रक्षोगण । मुक्त केलें जनस्थान ।
दृष्ट निवटोनि रावण । सुरगण सोडविले ॥ ४२ ॥
कर्म आचरोनि अद्भुत । संपादिला सुरकार्यार्थ ।
वनीं श्रमला रघुनाथ । व्रत समाप्त पै करावें ॥ ४३ ॥
श्रीरामराज्याभिषेकाची सर्व जबाबदारी आपण स्वीकारावी
अशी भरताची त्या दोघांना प्रार्थना :
तुम्ही प्रियकर रामाचें । तुमचें वचन मानीं साचे ।
सुमुहुर्त अभिषेकाचें । तुम्ही साचें संपादा ॥ ४४ ॥
म्हणोनि धरिले दोनी चरण । येरू पाली लोटांगण ।
आम्ही तुझें किंकर जाण । आज्ञापन करीं आम्हां ॥ ४५ ॥
सुग्रीवादि बिभीषण । अंगदादि मारुति जाण ।
भरतें नमिलें वानरगण । मृदु वचनें विनवोनी ॥ ४६ ॥
सुग्रीवासी अति प्रीतीं । भरत करीतसे विनंती ।
अभिषेकावया रघुपती । आज्ञा दूती करावी ॥ ४७ ॥
अभिषेकाय रामस्य दूतानाज्ञापयत्स्वयम् ।
तच्छ्रुत्वा वानरेन्द्रश्च सौवर्णांश्चतुरो घटान् ॥ २ ॥
चतुर्णां कपिमुख्यानां ददौ रत्नविभूषितान् ॥ ३ ॥
उदईक सकाळी अभिषेकासाठी चारी दिशांचे उदक आणण्यास सुग्रीवाला भरताने सांगितले :
श्रीराम अभिषेकावया सांग । प्रभाते मुहूर्त अति अव्यंग ।
गुरुपुष्य अमृतसिद्धियोग । पाहिजे अति वेग पै केला ॥ ४८ ॥
इतर पदार्थी नाही अटक । पाहिजे चतुःसमुद्रीचें उदक ।
तें तुम्हीं आवश्यक । पाहिजे सम्यक आणिलें ॥ ४९ ॥
ऐकोनि भरतवचन । जोडल्या करीं वानरगण ।
सुग्रीवासी विनवण । करोनि जाण पूसत ॥ ५० ॥
कोणे दिशेप्रती कोण । जाणें नेमूनि आपण ।
शीघ द्यावें आज्ञापन । आणावया पूर्ण समुद्रजळ ॥ ५१ ॥
ऐकोनि जुत्पत्तींचे वचन । सुग्रीव झाला सुखैकघन ।
दिशा नेमूनि संपूर्ण । केलें आज्ञापन सेवकां ॥ ५२ ॥
हेमकुंभ रत्नाभरणी । भरतें आणिलें तत्क्षणीं ।
सृष्टीचे अति प्रीतीकरोनि । दिधले वांटूनी जुत्पती ॥ ५३ ॥
उत्तरेला हनुमंत, दक्षिणेला भषभ, पश्चिमेला नळ व
पूर्वेला अंगद याप्रमाणे सुग्रीवाने उदक आणण्यास पाठविले :
उत्तर दिशा अतिदुरंत । हनुमान पाठविला तेथ ।
दक्षिणे ऋषभ विख्यात । कुंभेंसहित निघाला ॥ ५४ ॥
नळ पश्चिम समुद्रासी । वेगें निघाला हेमकुंभेंसीं ।
अति उल्लासें निश्चयेसी । पूर्वे अंगदासी नेमिलें ॥ ५५ ॥
युवराजा अति पवित्र । अति बळियाढा अंगद वीर ।
लक्षून गेला पूर्वसमुद्र । वेगवत्तर हेमकुंभें ॥ ५६ ॥
चहूं दिशां चौघे जण । अति बळियाढे वानरगण ।
वेगें करोनि उढाण । क्षणें गगन आक्रमिलें ॥ ५७ ॥
वेगें जावोनि सिंधुपासीं । रत्नजडित हेंमकुंभेंसीं ।
शुद्ध प्रक्षाळून वेगेंसीं । समुद्रोदकासी भरियेलें ॥ ५८ ॥
त्या चौघा वीरांनी सूर्योदयापूर्वीच हेमकुंभ भरून
सागरतीर्थ आणले, त्यामुळे वसिष्टादिकांना अपार आनंद :
सूर्योदय न होता पूर्ण । घेवोनि आले समुद्रजीवन ।
वसिष्ठापुढें ठेवोनि जाण । लोटांगण घातलें ॥ ५९ ॥
देखोनि वानरांचा प्रताप । उड्डाण किराण साटोप ।
वसिष्ठ सुखावला अमूप । प्रीतिपूर्वक आलिंगी ॥ ६० ॥
श्रीरामभजनपरिपाटीं । वानरांची नित्य पुष्टितुष्टी ।
अहंसोहं सुटल्या गांठी । सद्गुरुभेटी निश्चितीं ॥ ६१ ॥
देखोनियां समुद्र जीवन । सुग्रीव आणि बिभीषण ।
सुख उथळलें गहन । श्रीरघुनंदन अभिषेका ॥ ६२ ॥
भरत येवोनि आपण । धरिले वसिष्ठाचे चरण ।
स्वामींनी केलें आज्ञापन । श्रीरघुनंदनअभिषेका ॥ ६३ ॥
भरताने वसिष्टांना त्यांच्या पवित्र हस्ते रामांना अभिषेक करण्याचे विनविले :
तरी श्रीरामाभिषिंचन । करावया मी मशक कोण ।
स्वामींनी निजहस्तेंकरोन । अभिषिंचन करावें ॥ ६४ ॥
सद्गुरुहस्तें अभिषेक होतां । अक्षय राज्य रघुनाथा ।
आम्हां सकळां अति श्लाघ्यता । जाण तत्वतां स्वामिया ॥ ६५ ॥
आणि श्रीरामाचें मनोज्ञ । ऐसेंचि आहे जाण ।
जें गुरुहस्तें अभिषिंचन । तें अक्षय पूर्ण स्वामिया ॥ ६६ ॥
यालागीं तुम्हीं निजहस्तें । अभिषेकावें श्रीरामातें ।
ऐकोनि भरतवचनातें । वसिष्ठ चित्तें सुखावला ॥ ६७ ॥
अभिषेकाय रामस्य शत्रुघ्नः सचिवैर्तृतः ।
पुगेहिताय श्रेष्ठाय वसिष्टाय नवेदयत् ॥ ४ ॥
शास्त्रदृष्टेन विधिना महाद्भिर्विदितेन व ॥ ५ ॥
सर्वांच्या विनंतीने वसिष्ठांना संतोष :
भरत आणि शत्रुघ्न । सुग्रीवादि बिभीषण ।
सकळीं वसिष्ट प्रार्थून । केला प्रसन्न अभिषेका ॥ ६८ ॥
सुमंत आणि हनुमान वीर । सकळ प्रधानांचा भार ।
रलकुंभ जल सागर । अति सत्वर निवेदिलें ॥ ६९ ॥
देखोनि समुद्रजीवन । वरी भरताचें आज्ञापन ।
तेणें वसिष्ठ सुखायमान । केलें नमन ऋषिवरां ॥ ७० ॥
श्रीरामांच्या अभिषेकाला सर्वांची उपस्थिती, त्यांची नावे :
सकळ भूमंडळीचे ऋषीश्वर । सनकादि सिद्ध समग्र ।
नारदादि भक्तवर । सकळ रघुवीरअभिषेका ॥ ७१ ॥
ब्रह्मा जो कां निजपिता । तोही बोलाविला तत्वतां ।
अभिषेकावया रघुनाथा । आला धाता लोकपाळांसी ॥ ७२ ॥
यक्ष गंधर्व चारण । निगणेंसीं त्रिनयन ।
सिद्ध पातले धांवोन । श्रीरघुनंदनअभिषेका ॥ ७३ ॥
जलचर स्थळचर । दानवमानव पाताळचर ।
अयोध्ये दाटले समग्र । पहावया रघुवीरअभिषेका ॥ ७४ ॥
नभ दाटलें विमानीं । पृथ्वी दाटली नृपयानीं ।
तेणें सुखावली अवनी । रामाभिषिंचनी आनंद ॥ ७५ ॥
वसिष्ठ सद्गुरु धर्मज्ञ । केलें सकळां विज्ञापन ।
तुम्ही निज वैभवेकरून । रघुनंदन अभिषेका ॥ ७६ ॥
मंडळवर्ती आले भूपाळ । त्यांसी आज्ञापिलें तत्काळ ।
उपायनें आणा सकळ । रधुकुळपाळअभिषेका ॥ ७७ ॥
त्रैलोक्यविजयी रघुपती । आला ऐकोनि अयोध्येप्रती ।
राजे पातले भूपती । अभिषेकार्थी सत्वर ॥ ७८ ॥
पूर्वपश्चिमनृपती । उत्तरेचे नेणों किती ।
दक्षिणदिशेचे भूपती । आले गडपती गडपाळ ॥ ७९ ॥
पर्वतवासी जे भूपती । म्लेंच्छ राजे नेणों किती ।
गौडबंगाल असंख्यस्थितीं । आले रधुपतिअभिषेका ॥ ८० ॥
सर्वांनी आपापल्या योग्यतेनुरूप रामांची पूजा करावी अशी वसिष्ठांची आज्ञा :
जितुकें जयाचें सामर्थ्य । तितुकेनिसीं रघुनाथ ।
स्वयें पूजावा यथोचित । वसिष्ठें तेथ आज्ञापिलें ॥ ८१ ॥
ऐकतां वसिष्ठवचन । अवघे झाले सुखैकघन ।
यथासामर्थ्ये करोनि जाण । पूजाविधान मांडिले ॥ ८२ ॥
पूर्व दिवशी उपोषण करून रामांनी त्या दिवशी
मंगलस्नान केल्यावर वसिष्ठांकडून रामांना अभिषेक :
मुक्त करोनि जटाबंधन । सौमित्रजानकींसहित जाण ।
श्रीरामें करोनि मंगलस्नान । उपोषण पूर्वदिवसीं ॥ ८३ ॥
श्रीरामा सहजचि उपोषण । चौदा वर्षे व्रत गहन ।
राज्याभिषेकीं विधिपाळण । फळभोजन न करीचि ॥ ८४ ॥
प्रभाती गुरुपुष्यकरीं । वसिष्ठ रामासी अभिषेक करी ।
परिसा तेथींची नवलपरी । संक्षेपाकारीं सांगेन ॥ ८५ ॥
श्रीरामाचें अभिषिंचन । सकळ आकळूं शके कोण ।
वक्ता एक जनार्दन । निजनिरूपण चालवित ॥ ८६ ॥
अभिषेकसोहळ्याचे रामच वर्णन करवितात :
तेथें संकोच साकल्यता । सुचूं परिहार केउता ।
स्वयें श्रीराम वदनी वक्ता । कर्ता करविता तोचि तो ॥ ८७ ॥
श्रीराम आणि जनार्दन । स्वरूप एक नामें भिन्न ।
जना सबाह्य असोनि पूर्ण । करवी चळण इंद्रियांचें ॥ ८८ ॥
जनार्दन वदतां वदनीं । अर्थमय शब्दश्रेणी ।
उघडित प्रेमाची खाणी । निजात्मगुणीं विनवोनी ॥ ८९ ॥
नयनीं देखता जनार्दन । जनार्दन वदवी वचन ।
रसने रसज्ञ आपण । घ्राणीं अवघाण सुवास तो ॥ ९० ॥
त्वगिंद्रियस्पर्शनानंद । तो जनार्दनें केला बोध ।
बुद्धीचा निश्चयो शुद्ध । अति विशुद्ध जनार्दनें ॥ ९१ ॥
चेतवोनि अहंकार । दाटोवाटी निजचरित्र ।
चालवित अति सत्वर । इतर व्यापार सांडोनी ॥ ९२ ॥
असो परिहाराचा अतिशयो । कर्ता करविता रामरावो ।
तेथें कायसा संदेहो । निजनिर्वाहों श्रीरामें ॥ ९३ ॥
अभिषेक श्रीरघुनाथा । सर्वज्ञ वसिष्ठ स्वयें कर्ता ।
अवधान द्यावें श्रोतां । साधकां तत्त्वतां उपयोगी ॥ ९४ ॥
श्रीरामांच्या सर्व उपचारांचे आध्यात्मिक रूपकात्मक वर्णन :
सर्वदा पूर्णमनोरथ । तोचि औदुंबर सदाफळित ।
भद्रपीठ अति मंडित । तेच अद्मुत झळके कीं ॥ ९५ ॥
दुजें पीठ देदीध्यमान । सूर्यमंडळासमान पूर्ण ।
द्वादशकळामंडित जाण । श्रीरघुनंदनअभिषेका ॥ ९६ ॥
त्यावरी पीठ तिजें । षोडशोपचारीं विराजे ।
चंद्र देखोनि त्यातें लाजे । दडी मारिजे आसनातळीं ॥ ९७ ॥
एवं सूर्य अग्नि चंद्रमा । आसनातळीं दाटती रामा ।
त्या श्रीरामाचा महिमा । वाग्धर्मा अनिर्वाच्य ॥ ९८ ॥
क्रोधव्याघ्राचें शोधून अंतर । क्रूरचारट सांडोनि दूर ।
शांतिचर्म अति परिपर । श्रीरधुवीरवरासना ॥ ९९ ॥
हेमकुंभ शतानुशत । दीर्घ वोसंडे वृषभ ऑ ।
सुवणभृंगार क्षीरयुक्त । अति मंडित अभिषेका ॥ १०० ॥
अनिर्वाच्य त्याचें महिमान । जिहीं रामाभिषेकीं क्षीर जीवन ।
हृदयीं धरिलें सावधान । भाग्य गहन तयांचें ॥ १०१ ॥
वस्त्रें सपुर विरंजांबरें । अत्यंत भावार्थ परिकरें ।
वेढावया श्रीरघुवीरें । आणिली पवित्रे पूजेसीं ॥ १०२ ॥
प्रेमजळें पूर्ण परम । सिंधुसंगम शुद्धसंगम ।
गंगायमुना त्रिवेणीसंगम । आणिलीं परम पवित्रजळें ॥ १०३ ॥
सप्तधातू ते शोधित देखा । आणिले सप्त कुश सप्त मृत्तिका ।
सप्त ऋषि आणिले ऐका । रघुकुळटिळकअभिषेकीं ॥ १०४ ॥
संकल्पविकल्पातीत । चैतन्य प्रभवे वेगयुक्त ।
मनोवेगातें जिणोनि जात । तैसा वारुवीं रथ जुंपिला ॥ १०५ ॥
असंभावना विपरीत ज्ञान । हेचि मत्त पंचानन ।
त्यातें विदारिते शार्दूल गहन । रथी जुंपोन आणिले ॥ १०६ ॥
शुद्धसत्वें अति मंडित । चंद्रोपम छत्र श्वेत ।
श्वेत चामरे रत्नदंडयुक्त । सुवासित भक्तिव्यजनें ॥ १०७ ॥
रामाभिषेकीं मंगल पूर्ण । शांतिगौचें गोरोचन ।
नामें हरिद्रा सुरंगपूर्ण । सौभाग्यमंडन सर्वदा ॥ १०८ ॥
भक्तिप्रेमें लवलव । क्षीरपल्लव पद्यपल्लव ।
तोरणे बांधिलीं अपूर्व । श्रीरघुरावअभिषेका ॥ १०९ ॥
दधिमधुघृताक्षतायुक्त । पूर्णकलशेंसीं सालंकृत ।
अष्टौ कन्या पैं दानार्थ । उभ्या तिष्टत अभिषेका ॥ ११० ॥
मुकुट कुंडलें कटिमेखळा । बाहुअंगदें सुमनमाळा ।
सिद्ध सामग्रिया सकळां । ब्राह्मणमेळा तिष्ठत ॥ १११ ॥
ततः पुरोहितो वृद्धो वसिष्टो ब्राह्मणैः सह ।
रामं रत्नमये पीठे ससितं संन्यवेशयन् ॥ ६ ॥
वसिष्ठो वामदेवश्व जाबालिरथ काश्यप: ।
कात्यायनो भरद्वाजो विजय: सहगौतमः ॥ ७ ॥
अभ्यषिंचन्नरव्याघ्रं प्रसन्नेन सुगंधिना ।
सलिलेन सहस्राक्षं वसवो वासवं यथा ॥ ८ ॥
अभिषेकासाठी वसिष्ठ, वामदेव, जाबाली इत्यादी ब्रह्मर्षींची हजेरी :
षडूगुणेश्वर्यसंपन्न । वृद्ध कुळगुरु सनातन ।
श्रीवसिष्ठ ज्ञानघन । श्रीरघुनंदनअभिषेका ॥ ११२ ॥
आणिकही विख्यात ऋषिजन । ब्रह्मादि देवां नित्य मान्य ।
ज्यांचेनि नामें पापमोचन । जे भवतारण प्रतापें ॥ ११३ ॥
ऐका त्यांचे अभिधान । वामदेव जाबालि कश्यप जाण ।
कात्यायन भरद्वाज गहन । नामें पावन महीतळीं ॥ ११४ ॥
आणीकही ऋषि बहुत । जे पृथ्वीचे स्तंभ मूर्त ।
अभिषेकावया श्रीरघुनाथ । आले शीघ्रवत समकाळें ॥ ११५ ॥
अयोध्यानगरे रम्ये रत्नमंडपमध्यगे ।
स्मृता कल्पतरोर्मूले रत्नसिंहासने शुभम् ॥ ९ ॥
तन्मध्येऽष्टदलं पद्य नानारत्नप्रवेष्टितम् ।
तत्र रामं च ऋषयो ध्यायंतेऽजं परात्परम् ॥ १० ॥
वेदमंत्रांच्या मंगल घोषांत सर्व ऋषींनी रामजानकीला अभिषेक केला :
ऐसें ऋषिवरीं सकळिकीं । श्रीरामासहित जानकी ।
रत्नमंडपीं बैसवोनि निकी । अभिषेकीं सुमुहूर्त ॥ ११६ ॥
पुण्यपूज्य ऋषीश्वर । करिती वेदघोषउच्चार ।
दीर्घस्वरें मंत्रोच्चार । श्रीरधुवीरअभिषेकीं ॥ ११७ ॥
सुमंगलें सुवासित । पुण्यजळें अति विख्यात ।
आणिलीं होतीं पुण्योचित । तिहीं रघुनाथ अभिषेकिला ॥ ११८ ॥
श्रुतिस्वरांचे उच्चार । पुराणोक्त मंत्र अपार ।
जयजयकारें अंबर । गर्जे सत्वर रामनामें ॥ ११९ ॥
सकळ सुरवर स्वर्गस्थ । देवगुरुसमवेत ।
जेंवी इंद्रातें अभिषेकित । तेंवी रघुनाथ अभिषेकिला ॥ १२० ॥
ज्यासी जेथे जेथें अधिकार । तेणेंकरोनि रघुवीर ।
अभिषेकिला अति सत्वर । निजउद्धार व्हावया ॥ १२१ ॥
पदाभिमानें संतप्त । हर्षविषादीं दुःखित ।
तेथोनि व्हावया निर्मुक्त । आर्ते रघुनाथ अभिषेकिती ॥ १२२ ॥
तया अभिषेकाचें लक्षण । यथामति निवेदीन ।
साधु श्रोतें स्वामी सर्वज्ञ । द्यावें अवधान कूर्मावलोकनें ॥ १२३ ॥
ऋत्विग्भिर्बाह्मणै: सार्धं कन्याभिर्मंत्रिभिस्तदा ।
बलमुख्यैश्व संहृष्टैः सोडभिषिक्तश्च नैगमैः ॥ ११ ॥
सर्वौषधिरसैश्चैव दैवतैर्नभसि स्थितैः ।
चतुर्भिर्लोकपालैश्व समेतै: सर्वदैवतै: ॥ १२ ॥
कोणी कोणी श्रीरामांना कसा कसा अभिषेक केला :
नित्यानित्यविवंचन । तेणें वेद श्रमला पूर्ण ।
देखोनयां रघुनंदन । केलें अभिषिंचन नेतिशब्दें ॥ १२४ ॥
ऋत्विज जे कां अभिषेकार्थी । कर्मकलापक्रियायुक्ती ।
देखोनियां श्रीराममूर्ती । निष्कर्मस्थितीं अभिषेक ॥ १२५ ॥
अष्टनायिका सौंदर्यबल । तिहीं देखोनि रघुकुळपाळ ।
निजावयवीं विटोनि सकळ । लाजिल्या प्रबळ अभिषेकीं ॥ १२६ ॥
मंत्री प्रधान सेनानी । सामर्थ्ये बुद्धिबळेंकरोनी ।
तेही श्रीरामातें देखोनी । अभिशिंचनीं लाजिले ॥ १२७ ॥
वनस्पतींचा राजा सोम । ओषधिरस सर्वोत्तम ।
अभिषिंचिता रघूत्तम । सुरसोत्तम ओषधीं ॥ १२८ ॥
चतुर्दिशांचे दिक्पाळ । देवगंधर्वादि सकळ ।
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । श्रीराम तत्काळ अभिषेकिती ॥ १२९ ॥
अमर अमृत सेविती । परी मरणार्णवा न चुकविती ।
अमृताभिषेकीं रघुपती । अमृतप्राप्ती अमरांसी ॥ १३० ॥
मानवीं सिंचन प्रेमामृतें । पन्नगीं सिंचन परामृतें ।
गंधर्वीं श्रीरामातें । नादामृतें अभिषेकिलें ॥ १३१ ॥
हरिदासीं नामामृतें । अट्टाहास्यें आनंदयुक्ते ।
अभिषेकिलें श्रीरामातें । केलें त्रैलोक्यातें पावन ॥ १३२ ॥
अयोध्येच्या जनीं समस्तें । चित्ते विटे जीवितें ।
अभिषेकिलें श्रीरामातें । उछासितें निजमनें ॥ १३३ ॥
भरतें अभिषेकिलें भावार्थे । श्रीराममाता पुत्रस्नेहार्थे ।
सौमित्र शत्रुघ्नें हर्षें तेथें । केला स्वामीतें अभिषेक ॥ १३४ ॥
स्थावर जंगम चराचर । जीवमात्र लहान थोर ।
त्यांहीं राजा श्रीरामचंद्र । सर्वस्वें साचार अभिषिंचिला ॥ १३५ ॥
छत्रं तस्य तु जग्राह शत्रुघ्नः पांडुरं महत् ।
श्वेतं व वालव्यजनं सुग्रीवो वानरेश्वरः ॥ १३ ॥
अपरं चंद्रसंकाशं वालव्यजनमुत्तमम् ।
हृष्टो रामस्य जग्राह राक्षसेंद्रो बिभीषणः ॥ १४ ॥
मालां ज्वलंतीं वपुषा कांचनीं शतपुष्कराम् ।
राघवाय ददौ वायुर्वासवेन प्रचोदितः ॥ १५ ॥
रत्नाध्यक्ष: समुद्रस्तु मणिरत्नपरिष्कृतम् ।
मुक्ताहारं समादाय प्रादाच्छक्रप्रचोदितः ॥ १६ ॥
अभिषेक समारंभात प्रत्येकाने केलेली सेवा :
भावार्थाचें वास परिकर । पीतांबर अति मनोहर ।
भरतें आणोनि सत्वर । श्रीरामचंद्र पूजिला ॥ १३६ ॥
सद्गुरू वसिष्ठें आपण । चिद्रत्नाचें जडित भूषण ।
शीघ्र आणोनियां जाण । श्रीरघुनंदन अलंकारिला ॥ १३७ ॥
छत्र शुद्ध श्वेतांबर । चंद्रप्रभासम परिकर ।
श्रीरामावरी प्रीतिपुरःसर । शत्रुघ्नें सत्वर धरियेले ॥ १३८ ॥
कनकदंडें रत्नाकारें । शुभ व्यंजनें परिकरें ।
दोघां जणीं युग्मचामरें । अति सत्वरें धरियेलीं ॥ १३९ ॥
सुग्रीव आणि बिभीषण । चामरधारी दोघे जण ।
स्वयें होवोनि आपण । श्रीरघुनंदन वीजिती ॥ १४० ॥
इंद्रा अति गौरव । तेणें अमरावतीचें वैभव ।
आणोनि पूजिला राघव । सुखें स्वयमेव बंदिमोचनें ॥ १४१ ॥
देखोनि इंद्राची पूजनकळा । आनंद सकळां लोकपाळां ।
वायूनें येवोनि तत्काळा । घनसांवळा पूजिला ॥ १४२ ॥
कांचनयुक्त रत्नमाळा । विचित्रगुणी विचित्रकळा ।
आणोनियां तत्काळा । घनसावळां पूजिला ॥ १४३ ॥
जावोनि शेषशयनींहूनी । रामें निवटिला दशाननी ।
क्षीरसागरें संतोषोनी । भेटी रामालागोनी आणिली ॥ १४४ ॥
स्वयें रत्नांचा निकर । विचित्र रत्नें परिकर ।
मुक्तघोषीं मंडित हार । गुंफोनि सत्वर आणिला ॥ १४५ ॥
श्रीरामें देखोनियां दृष्टीं । बाणिला जनकात्मजाकंठीं ।
तेणें शोभली गोरटी । श्रीराम नेहटी अंकस्थ ॥ १४६ ॥
प्रकृत्या सीतया सार्धं सूर्यवत्तिग्मतजसम् ।
चतुर्भुजं शंखचक्रगदापंकजधारिणम् ॥ १७ ॥
किरीटहारकेयूररत्नकुंडलशोभितम् ।
देवैः सह मुनींद्रैश्च योगिवृंदैश्च सेवितम् ॥ १८ ॥
क्षीरसिंधूची दुहिता । जनकात्मजा सती सीता ।
संतोषावया तिच्या चित्ता । श्रीरामें सीता पूजिली ॥ ४७ ॥
इतरही जे जे लोकपाळ । यथासामर्थ्यें अविकळ ।
पूजिते झाले पै सकळ । रघुकुळपाळ निजराजा ॥ ४८ ॥
यथासामर्थ्यें यथाचित्तें । वित्तें जीवितें भावार्थें ।
पूजिते झाले श्रीरामातें । उल्लासित मानसीं ॥ ४९ ॥
श्रीरामाचा राज्याभिषेक । पाहूं आले तिन्हीं लोक ।
तिहीं यथासामर्थ्ये देख । रघुकुळटिळक पूजिला ॥ १५० ॥
सिंहासनारूढ श्रीरामांची निस्सीम तेजस्विता :
सिंहासनीं श्रीरामचंद्र । शोभा शोभली विचित्र ।
लाजोनि रविचंद्र । प्रकाश मनोहर सुखमय ॥ १५१ ॥
ते काळींच्या रूपासी । सीमा न करवे शास्त्रांसीं ।
मौन पडलें उपनिषदांसी । नेति वादेंसी वेद परते ॥ १५२ ॥
तया रूपाचें वर्णन । वदावया मी अल्प दीन ।
कृपाळू एका जनार्दन । निजात्मवर्णन सांगत ॥ १५३ ॥
श्रुतीस रिघतां जेथें सांकडें । परेसी सर्वथा नातुडे ।
तेथें वैखरी सैरां वावडे । हे सामर्थ्य घडे गुरुकृपेसीं ॥ १५४ ॥
गुरुकृपेचे निजपक्षें । अलक्ष लक्षेंवीण लक्षे ।
निर्विकल्पीं सावकाशें । स्वयें प्रकाशे मन बुद्धि ॥ १५५ ॥
तो जगद्गुरू जनार्दन । एकाएकीं वोळला पूर्ण ।
श्रीरामस्वरूपाचें वर्णन । आपल्या आपण सांगत ॥ १५६ ॥
त्या श्रीरामाचें स्वरूपवर्णन । श्रोते परिसोत सावधान ।
एका विनवी जनार्दन । स्वानंदघन श्रीराम ॥ १५७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
श्रीरामराज्याभिषेको नाम त्र्यशीतितमोऽध्यायः ॥ ८३ ॥
ओंव्या ॥ १५७ ॥ श्लोक ॥ १८ ॥ एवं ॥ १७५ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्र्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्र्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्र्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्र्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्र्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्र्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्र्याऐंशिवा