वर्षात येणाऱ्या 24 एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असतात धार्मिक दृष्टीने सर्व एकादशीला मोठं महत्वपूर्ण मानलं जातं. प्रत्येक एकादशीचा वेगळं नाव आणि महत्त्व असतं. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पापमोचनी एकादशी म्हणतात. पापमोचनी एकादशीने माणसाचे सर्वात मोठे पापही नाहीसे होते . प्रत्येक एकादशीप्रमाणे पापमोचनी एकादशीचे व्रत देखील भगवान विष्णूला समर्पित करण्यात आली आहे . या एकादशीची व्रत कथा वाचून किंवा ऐकल्याने १००० गाय दानाएवढे पुण्य प्राप्त होते, असा विश्वास आहे. या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आज आकर्षक सजावट करण्यात आली. यामध्ये गाभारा, समाधी स्थळ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला. रंगीबेरंगी फुलांमध्ये हा गाभार खूलून दिसत आहे.
यावेळी पापमोचनी एकादशी व्रत 27 मार्च 2022 रोजी संध्याकाळी 06:04 पासून सुरू झाली आहे. पापमोचनी एकादशी व्रतला पाप हरणारी एकादशी म्हटलं जाते. मार्च 29 – सकाळी 06:15 ते 08:43 पर्यंत असेल द्वादशी पारणतिथीला समप्ती – दुपारी 02:38 वाजता संपेल. जर तुमच्यावर कर्जाचा बोजा असेल आणि तुम्हाला लवकरात लवकर यातून सुटका हवी असेल तर एकादशीच्या दिवशी भरपूर पाण्यात थोडी साखर मिसळून प्या. नारायणाचे ध्यान करताना हे पाणी पीपळाला अर्पण करा आणि समस्या सोडवण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा.
सर्व छायाचित्रे पुढीलप्रमाणे पहा.