वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन एक नारायण सार जप – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७५५
वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन एक नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरिविण धर्म ।
वाऊगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठें गेलें ते निवांतचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमन-कळिके ॥३॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ।
यमे कुळ गोत्र वर्जियेलें ॥४॥
अर्थ:-
एक हरिनामच साररुप आहे हेच वेद शास्त्रांचे प्रमाण व श्रुतीचे वचन आहे. जप तप हे कर्ममार्ग आहेत त्यामुळे वाऊगा श्रम होतो व शेवटी सगळे व्यर्थ ठरते एक हरिनामच खरा धर्म आहे. भ्रमर जसा फुला मध्ये निवांत बसुन असतो तसे हरिनाम करणारे निवांत राहतात. हरिनामाचा मंत्र म्हणुन तेच शस्त्र केले तर यम त्याच्या कुळाकडे फिरकत नाही असे माऊली सांगतात.
वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन एक नारायण सार जप – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७५५
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.