संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

त्वचेचिया रानां धाडूं नको मना – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १५६

त्वचेचिया रानां धाडूं नको मना – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १५६


त्वचेचिया रानां धाडूं नको मना ॥
तेयें नंदाचा कान्हा डोळा घाली गो आइयो ॥१॥
गाईचा गोंवळा यमुनेचा पावळा ।
धरी माझा अचुळा मग मी पळालिये गो ॥२॥
ताकपिरी गोंवळी केली मजसी रांडोळी ।
भावे नारली मग मी पळालिये गो ॥२॥
गळा गुंजमाळा गांठी । डांगा मोरविसा वेठी ।
सोकरु लागे पाठी । नंदरायाचा गो आई ये ॥३॥
एक्या करें धरी । विजा करें वेटारी ।
चुंबन दे हरी । मग मी पळालिये गो ॥४॥
ऐसी पळत पळत गेलिये ।
कान्होनें मोहिलिये । माझी मीचि जालिये ।
मग मी समोखिलिये गो ॥५॥
तुना चार । लागतेगोर । तुना बोर लागतो गोर ।
तुना बाही माझी चार । माझी आईयो गो गो ॥६॥
पूर्वपुण्य फ़ळलें । देह मुक्त जाले ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
ऐसें केलें गो आईयो ॥७॥

अर्थ:-

एक गौळण भगवंताची सुंदर कांती बघून दुसऱ्या गौळणीला सांगते आहे. हे बघ तूं आपल्या मनाला त्या श्रीकृष्णाच्या शरीराकडे जाऊ देऊ नकोस.तो श्रीकृष्ण स्त्रीयांना फार डोळे मारतो. काय सांगू बाई यमुनेच्या तीरांवर गायी राखणाऱ्या, कृष्णानी माझा पदरच धरला. त्यासरसी मी पळून गेले.त्याच्याबरोबर असणाऱ्या ताक पिणाऱ्या गुराख्यांच्या पोरांनी माझी फजिती केली. म्हणजे भावाने मला घेरुन टाकले. पण त्यांच्यातून निष्टून मी पळून गेले. त्या श्रीकृष्णांच्या गळ्यांमध्ये गाठलेल्या गुंजाच्या माळा असून हातांत काठ्यां आहेत.आणि ज्याच्या मस्तकांवर मोराची पिसे खोवलेली आहेत. असे ते नंदाचे पोर माझ्या पाठीसी लागले. त्याने मला एका हाताने धरुन दुसऱ्या हाताने अलिंगन देऊन त्याकृष्णाने मला चुंबन दिले. मग मी त्याला सोडून पळून जाऊ लागले. पण त्याकृष्णाने मला मोहित करुन टाकले असल्यामुळे पळून जाता आले नाही. त्यामुळे मी जागच्याजागीच आत्मरुप होऊन संतोषित झाले त्यामुळे हे श्रीकृष्णा आतां मला तुझा आचार व बोलणे गोड लागू लागले. त्याच्या प्रमाणेच माझा आचार झाला.माझे पूर्वपुण्य फलद्रुप होऊन मी जीवन्मुक्त झाले. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या कृपेने मला असे केले.असे माऊली सांगतात.


त्वचेचिया रानां धाडूं नको मना – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १५६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *