सुनीळ जें ब्रह्म बिंब सत्रावीचें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८९०
सुनीळ जें ब्रह्म बिंब सत्रावीचें ।
विश्वरुप चैतन्य महाकारणीं ॥१॥
ब्रह्मज्योतीचिये प्रकाशें करुनी ।
देखे त्रिभुवनीं एक वस्तु ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ज्यीतीची जे ज्योती ।
ब्रह्मरंध्री वस्ती परमात्मयाची ॥३॥
अर्थ:-
ब्रह्मरंधातील नीलवर्ण बिंदुरूप बह्म सत्रावी नावाच्या अमृतसरोवराजवळ महाकारण देहात प्राप्त होते. त्या चैतन्याच्या प्रकाशाने सर्व जगत एक वस्तु आहे. असे ज्ञान करून घे. जगातील प्रकाशमान पदार्थांना प्रकाश देणारा जो परमात्मा तो ब्रह्मरंधात प्रगट होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
सुनीळ जें ब्रह्म बिंब सत्रावीचें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८९०
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.