जहाला इंद्र शेष तरी आम्हां काय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९७१

जहाला इंद्र शेष तरी आम्हां काय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९७१


जहाला इंद्र शेष तरी आम्हां काय ।
नैश्वरी तो पाहे भुललासे ॥१॥
हरिश्चंद्रादिक ब्रह्मादि करून ।
मायोपाधीन भास जाले ॥२॥
निरंजनी घेतां ययाचि पै शुद्धि ।
एकही अवधी न दिसती ॥३॥
हरिहरादिक देही सुकल्पिक ।
इतरांचा लेख कोण करी ॥४॥
गुरूकृपायोगें ब्रह्म ज्ञानेश्वर ।
तरला संसार भवसिंध ॥

अर्थ:-

इंद्राला स्वर्णाचे व शेषाला पाताळाचे राज्यभोग असले तरी आम्हाला त्याचे काय कौतुक ते क्षणभंगुर सुखातच गुरफटलेले आहेत. हरिश्चंद्र, ब्रह्मदेव वगैरे यक्ति देखील मायोपाधीने भासमात्र झालेले आहेत. शुद्ध ब्रह्माच्या दृष्टीने त्यांचे अस्तित्वच नाही. मोठ मोठे विष्णु शंकरादिक हेही जर काल्पनिकच आहेत तर इतरांची काय कथा. सद्गुरू कृपेने मी बह्मरूप आहे अशी खात्री होऊन या संसार सिंधुतून तरून गेलो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


जहाला इंद्र शेष तरी आम्हां काय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९७१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.