साभिमानें करुनी व्यर्थ कारे फुगशी ।
मत्त ऐसा होसी मतिमंदा ॥१॥
सर्वब्रह्मरुप हे खूण ओळखीं ।
भिन्नपण टाकीं निश्चयेंसी ॥२॥
मान अपमान तुज कांही नाहीं ।
तूं तंव विदेहीनित्य शुध्द ॥३॥
प्रारब्धानें देह भोगिता हे भोग ।
कासया रे सांग भ्रांती तुज ॥४॥
साधोनी अपरोक्ष वस्तु सर्वगत ।
ज्ञानेश्वर म्हणत राजयोंगी ॥५॥
अर्थ:-
हे मंदमति पुरुष तूं कर्तृत्व भोर्तृत्वाने उन्मत्त होऊन अहंकाराने व्यर्थ का फुगतोस त्या ऐवजी सर्व जगत ब्रह्मरुप आहे असा अव्दैत भाव प्राप्त करुन व्दैत भाव टाकून दे.मान अपमान धर्म देहाचे आहेत हा धर्म तुझा नाही तू त्या देहाहून भिन्न ब्रह्मरुप आहेस. प्रारब्धाने भोग भोगीत असताना तुला आपलेपणाचा भ्रम कशाला. सर्व व्यापकत्वाने ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान ज्याला झाले तोच राजयोगी होय असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.