ऐक रे सुमना बोधीन सुज्ञान – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९४१

ऐक रे सुमना बोधीन सुज्ञान – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९४१


ऐक रे सुमना बोधीन सुज्ञान ।
मायिक बंधन तुटे जेणें ॥१॥
श्रीगुरुचे पाय हृदयीं शिवशी ।
टाकी प्रतिष्ठेशी जाणिवेचे ॥२॥
नित्यानित्य दोन्ही करीं गा विचार ।
आहे मी हे कीर विचारिजे ॥३॥
जीव शिव भेद कासयासी जाहाले ।
वळखीं वहिले तिये स्थानीं ॥४॥
मुळीं तुझें रुप हे रें अनुभवणे ।
ज्ञानदेव म्हणे ब्रह्म तूंचि ॥५॥

अर्थ:-

मना ज्याच्या योगाने मायिक पदार्थाचे बंधन तुटेल अशा तत्वड्ञान चा उपदेश मी तुला करतो तो तूं नीट ऐक. पहिली गोष्ट मी शहाणा आहे हा अभिमान सोडून तूं श्रीगुरु चरणी लीन हो. नित्य काय आहे व अनित्य काय आहे याचा विचार करून, मी कोण आहे. हे जाणण्याची प्रथम खटपट कर.कर्ता, भोक्ता तो जीव, व त्याचा साक्षी जो तो शिव असा भेद कसा झाला. वास्तविक ब्रह्मरुपांशी दोन्हीही अभिन्न आहेत. तूं मूळचा ब्रह्मरुप आहेस हे अनुभवाने हेरुन म्हणजे बारकाईने चिंतन करून पहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


ऐक रे सुमना बोधीन सुज्ञान – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९४१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.