नीळवर्ण रज । नीळवर्ण बुझे ।
निळिमा सहजे । आकारली ॥१॥
नीळ प्रभा दिसे । नीळपणें वसे ।
निळिये आकाश । हरपलें ॥ध्रु०॥
निळेपण ठेलें । निळिये गोंविलें ।
निळपण सोंविळें । आम्हां जालें ॥२॥
ज्ञानदेवी निळा । परब्रह्मीं गोविला ।
कृष्णमूर्तिं सांवळा । ह्रदयीं वसे ॥३॥
अर्थ:-
त्या घननिळ्याच्या पायीच्या धुळी मनालाही निळेपण लाभले आहे.व ती सहज मनात आकारली. त्याचा निळा रंग असल्याने त्याची निलप्रभा पसरली आहे.व त्यात आकाश हारपले आहे. त्या देवाच्या निलवर्णामुळे भक्त ही निळेपणात न्हाले व त्यामुळे ते पवित्र झाले. मी त्याला परब्रह्मात ही निळेपणे पाहिला व ती कृष्णमूर्ती सावळेपणेच हृदयात वसली असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.