महा तेजा आंत बिंदू कोणे परी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८९१

महा तेजा आंत बिंदू कोणे परी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८९१

महा तेजा आंत बिंदू कोणे परी ।
उष्ण तेजा माझारीं साक्ष पाहा ॥१॥
कुंडलनी उर्ध्वमुखें अग्नी सोडी ।
तयाची हे जोडी संत जना ॥२॥
ज्ञानेश्वर म्हणे आत्मयातें जाणे ।
सुनिळ अनुभवणें निवृत्ती पाहा ॥३॥

अर्थ:-

ब्रह्मरंधातील तेजोमय नीलवर्ण ज्योतीतील तेजाचा कोणत्याही रीतीने अनुभव घ्या. प्राणायामाच्या योगाने योगाभ्यासी पुरूषांची कुंडलिनी नाडी जागृत होऊन ती वर तोंड करून अग्नी सोडते. व त्यामुळे संत लोकांना वरील तेजोमय ज्योतीचा अनुभव येतो. या तेजाला मी आत्मा समजतो. या ज्योतीचा अनुभव घ्यावयाचा असेल तर निवृत्तीनाथांना शरण जा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

महा तेजा आंत बिंदू कोणे परी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८९१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.