आकाशाचे ठायीं चंद्र सूर्य तारा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८७९
आकाशाचे ठायीं चंद्र सूर्य तारा ।
सूक्ष्माचा फेरा सर्वा ठायीं ॥१॥
बिंदुस्थान तेथें ब्रह्मरंध्र ज्योती ।
तेथे योगी वसती दिवस रात्र ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सर्वची हें शून्य ।
वस्तु परी पूर्णं सर्वाठायीं ॥३॥
अर्थ:-
आकाशात चंद्र सुर्य घिरट्या घालीत असतात परंतु आकाश मात्र सर्वत्र आहे तसेच आहे. योगाभ्यासी पुरूष ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असणाऱ्या ज्योतीवर लक्ष ठेऊन दिवसरात्र तेथेच वस्ती करतात. ब्रह्मदृष्टीने सर्व वस्तु एकदेशी आहेत ते ब्रह्म मात्र सर्व व्यापी आहे. असे माऊली ज्ञानदेव म्हणतात.
आकाशाचे ठायीं चंद्र सूर्य तारा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८७९
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.