विश्व ब्रह्म भासे ऐक्य येतां देहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८३०

विश्व ब्रह्म भासे ऐक्य येतां देहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८३०


विश्व ब्रह्म भासे ऐक्य येतां देहीं ।
अनुहातीं पाहीं अपार नाद ॥१॥
देखिला परी संयोगें व्यापला ।
विश्व तरीच झाला बाईयानो ॥२॥
पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला ।
माझा मीच झाला कोणकरी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे या अर्थाची सोय ।
धरी माझी माय मुक्ताबाई ॥४॥

अर्थ:-

प्रथम मी ब्रह्म आहे असा निश्चय झाला की सर्व जगत ब्रह्मरूपच आहे असे वाटते. ही दृष्टी योगाभ्यासी पुरूषांना जो अनुहत ध्वनी ऐकु येतो. त्याने प्राप्त होते. परंतु ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या मायेच्या संबंधामुळे तोच विश्वरूप बनला आहे.व्यष्टि किंवा समष्टि हा सर्व माझाच विस्तार आहे दुसरे कोण आहे.आपणच जगतरूपाने कसे दिसतो ही गोष्ट आमच्या मुक्ताबाईला कळली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


अनुहातीं पाहीं अपार नाद – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८३०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.