संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

योगिया मुनिजना ध्यानीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८३

योगिया मुनिजना ध्यानीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८३


योगिया मुनिजना ध्यानीं ।
तें सुख आसनीं शयनीं ॥१॥
हरिसुख फ़ावलें रे ॥ध्रु०॥
गोकुळींच्या गौळिया ।
गोपि गोधना सकळा ॥२॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलें ।
तें सुख संवगडिया दिधलें ॥३॥

अर्थ:-
योगी व मुनीजन यांच्या ध्यानातील सुख गोकुळवासियांना घरात पडल्या पडल्या ते सुख मिळाले. ते गोकुळीच्या गवळ्यांनाच नाही तर गोपी, गाई व गोधनासकट सगळ्यांना मिळाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी ते सुख सर्वांना दिले असे माऊली सांगतात.


योगिया मुनिजना ध्यानीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *