धांवत धांवत आलों नयनांजनीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८२३
धांवत धांवत आलों नयनांजनीं ।
प्रकाश दिनमणी उणा वाटे ॥१॥
निशी दिवस दोन्हीं नाहीं जेथ बारे ।
अर्धमात्रेवरी लक्ष ठेवीं ॥२॥
अक्षय अक्षर क्षरविरंहीत साजे ।
ज्ञानाचे जें ओझें चालेचीना ॥३॥
ज्ञानदेव चक्षु झाला परेवरी ।
यापरती बरोबरी नाहीं बापा ॥४॥
धांवत धांवत आलों नयनांजनीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८२३
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.