चहूं शून्याआरुतें महाशून्यापरुतें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८०१

चहूं शून्याआरुतें महाशून्यापरुतें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८०१

चहूं शून्याआरुतें महाशून्यापरुतें ।
सर्वांसी पहातें तेंची तें गा ॥१॥
दिसे तेंही शून्य पहा तेही
शून्य देहामजी निरंतर भिन्न रुप ॥२॥
शून्य निरशून्य दोन्ही हारपलीं ।
तेथूनी पाहिली निजवस्तु ॥३॥
ध्येय ध्यान ध्याता निरसुनी तिन्ही ।
झालों निरंजनी अति लीन ॥४॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणें ।
गुरुमुखें खुण सांगितली ॥५॥

चहूं शून्याआरुतें महाशून्यापरुतें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८०१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.