निळिये मंडळीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८

निळिये मंडळीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८


निळिये मंडळीं । निळवर्ण सांवळी ।
तेथें वेधलिसे बाळी । ध्यानरुपा ॥१॥
वेधु वेधला निळा । पाहे घननीळा ।
विरहणीं केवळा । रंग रसनें ॥ध्रु०॥
नीळवर्ण अंभ । नीळवर्ण स्वयंभ ।
वेधें वेधु न लभे । वैकुंठींचा ॥२॥
ज्ञानदेव निळी । ह्रदयीं सांवळी ।
प्रेमरसें कल्लोळीं । बुडी देत ॥३॥

अर्थ:-
निलवर्ण आकाशा सारखा सावळा पण निळी झाक असलेला कृष्ण बाल्यावस्तेत पाहिल्यावर त्याच्या दर्शनाचे वेध लागले. त्या आकाशीच्या निळेपणाला पाहुन त्या घननिळाचे वेध लागलेली विरहिणी त्याचे नामस्मरण तोंडाने करु लागली. तो घननिळा व त्या निळ्यारंगात रंगलेली विरहिणी मात्र तो वैकुंठाचा निळा भेटत नाही त्याचे तिला वेध लागले आहेत. त्या निलवर्ण असलेल्याला माझ्या हृदयात त्याच निळ्यारंगाने रंगुन त्यात प्रेमरस कल्लोळ करुन बुडी दिली असे माऊली सांगतात.


वरील अभंग व्हिडिओ स्वरूपात पहा


निळिये मंडळीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.