आनु नेणें कांहीं ।
विठ्ठलु स्मरें देहभावीं ॥१॥
पुंडलिका हें चिंतन ।
म्हणोनि विटेवरि हें ब्रह्म ॥२॥
रखुमादेविवरु शहाणे ।
विठ्ठलु पाहुणे पुंडलीका ॥३॥
अर्थ:-
माझा देहभाव जाण्याकरिता मी त्या विठोबारायाच्या स्मरणाशिवाय दुसरे काहीच करीत नाही. पुंडलिकरायांला या श्रीविठ्ठलाचा सतत ध्यास लागल्यामुळे वेदशास्त्राची खूण जे ब्रह्मस्वरूप तेच श्रीविठ्ठलाच्या रूपाने येऊन उभे राहिले म्हणून शहाण्या पुरूषाने इतर कांही एक न चिंतन करता एका श्रीविठ्ठलाचे चिंतन करावे त्यामुळे पुंडलिकरायाप्रमाणे त्यालाही माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठलांची प्राप्ती होईल असे माऊली म्हणतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.
View Comments
खुपच सुंदर