तनुमनुधनें पूजन पैं केलें । आत्मलिंग पूंजिलें बाईये वो ॥१॥ तंव निराकार देखिलें निराकार देखिलें । मी पूजन लिंग तिन्हीं हारपलें ॥२॥ रखुमादेविवरु निजलिंग विवळलें । आवघी आवघे ठायी सामावलें बाईये वो ॥३॥
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.