पातेजोनि खेंवासि आणिलें ।
येणें आपणिया समान मज केलें गे माये ॥१॥
पाहेपां नवल कैसें बितलें ।
मन उन्मनीं उन्मन ग्रासिलें ॥२॥
पाहेपां येणें रखुमादेविवरा विठ्ठले ।
पाहेपां राहणें पंढरपुरीं केलें ॥३॥
अर्थ:-
भगवान श्रीकृष्णाला अलिंगन देण्याकरीता जवळ केले व त्याला आदराने आलिंगन दिल्याबरोबर मला त्याने आपल्या सारखे करून टाकले.पहा, काय चमत्कार झाला. उन्मन जो परमात्मा त्या परमात्मस्वरूपाशी माझ्या मनाचा ग्रास करून ते उन्मन झाले.पहा, या रखुमादेविच्या पती श्रीविठ्ठलाने आपल्या स्वरूपाशी ऐक्य केल्यामुळे माझे राहाणे आपोआप पंढरपूरास झाले, असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.