स्वरुपी पाहातां लक्षलिही घेतां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६४५

स्वरुपी पाहातां लक्षलिही घेतां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६४५

स्वरुपी पाहातां लक्षलिही घेतां ।
अरुप अनंता गुणी नाहीं ॥१॥
कैसेनि स्वरुप प्रकाश पैं दीप ।
एकीं एका सोप आकळे कैसें ॥२॥
नाहीं या आधार आधारासि निर्धार ।
परेसि परे पार परमतत्त्व ॥३॥
ज्ञानदेवघरीं पश्यंती वोवरी ।
वेदश्रुती घरीं दीप केले ॥४॥

स्वरुपी पाहातां लक्षलिही घेतां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६४५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.