मन मुरे मग जें उरे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५८५

मन मुरे मग जें उरे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५८५


मन मुरे मग जें उरे ।
तं तूं कारे सेवीसिना ॥१॥
दिसतें परि न धरवें हातें ।
तें संतातें पुसावें ॥२॥
तेथींची खुण विरळा जाणे ।
निवृत्ति प्रसादें ज्ञानदेवो म्हणे ॥३॥

अर्थ:-

मनांतील संकल्प विकल्प नाहीसे झाल्यावर ते मन मनपणाने शिल्लक राहात नाही त्याठिकाणी परमात्माच एक शिल्लक राहतो. त्याचे ज्ञान तूं का करुन घेत नाहीस. तो परमात्मा ज्ञानाने दिसतो.. तरी पण तो निराकार असल्यामुळे त्याला हाताने धरता येत नाही. अशा त-हेचा जो परमात्मा त्याचे ज्ञान होण्याकरिता संतांना नम्र होऊन मला त्या परमात्म्याचे ज्ञान करुन द्या अशी विनंती करावी लागते. व हे वर्म क्वचित लोकांनाच कळते. संतांचे कृपेने ज्ञान होते हे मला श्रीनिवृत्तीरायांच्या प्रसादाने कळले असे माऊली सांगतात.


मन मुरे मग जें उरे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५८५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.