निळिये रजनी वाहे मोतिया सारणी ।
निळेपणें खाणीं सांपडली ॥१॥
आंगणीं चिंतामणि जळधरु सिंपणी ।
अमृतसाजणी जीवनकळा ॥२॥
सुमनाचे शेजे विरहिणी विराजे ।
शयनीं सुलजे आरळ सेज ॥३॥
माजयानें हटीं मुखकमळ टेंकी ।
निळिये अवलोकी कृष्णमूर्ति ॥४॥
कमळणी आमोद सुस्वाद मकरंद ।
चंदनाची अभेद उटी अंगी ॥५॥
कर्पूरपरिमळें दिव्य खाद्य फ़ळें ।
ठेऊनि सोज्वळें वाट पाहे ॥६॥
मन तो निळिये गोविंदाचिये सोसे ।
विरहिणी पाहे वाटुलि ऐसी ॥७॥
ज्ञानदेवी निळिये वाटुले गोविंदीं ।
कृष्ण निळिये पदीं ठाव जाला ॥८॥
अर्थ:-
मोत्याच्या सारणीतुन निळी रात्र वाहात आहे. अशी निळ्या मोत्यांची खाणच सापडली. तो चिंतामणी होऊन हृदयात अमृताचे शिंपण करतो. ती विरहिणी त्या पुष्प शय्येवर पडुडली आसुन ती तळमळत आहे. त्याने निळे मुखकमळ एकदा दाखवावे असे तिला मनोमन वाटते. ती विरहिणी मधाची चव व कमळाचा सुगंध घेऊन चंदनाची उटी लाऊन बसली आहे. कर्पुर मश्रीत उटी लाऊन ती रसरशित फळे घेऊन त्याची वाट पाहात आहे. तीचे मन त्या गोविंदाच्या सोसाने आतुरले असुन ती विरहिणी विरहात तळमळत आहे. त्या निळ्या गोविंद च्या निळ्या कृष्णपदात निळेपणे मनाला ठाव दिला आहे असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.