जंववरिरे तंववरी जंबुक करी गर्जना – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४८२
जंववरिरे तंववरी जंबुक करी गर्जना ।
जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥
जंववरिरे तंववरी वैराग्याच्या गोष्टी ।
जंव सुंदर वनिता दृष्टी देखिलीं नाहीं बाप ॥ध्रु०॥
जंववरिरे तंववरिरे मैत्रत्त्व संवाद ।
जंववरी अर्थेसि संबध पाडिला नाहीं बाप ॥२॥
जंववरिरे तंववरी युध्दाचीं मात ।
जंव परमाईचा पूत देखिला नाहीं बाप ॥३॥
जंववरिरे तंववरी समुद्र करी गर्जना ।
जंव अगस्ती ब्राम्हणा देखिलें नाहीं बाप ॥४॥
जंववरिरे तंववरी बांधी हा संसार ।
जंव रखुमादेविवर देखिला नाहीं बाप ॥५॥
जंववरिरे तंववरी जंबुक करी गर्जना – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४८२
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.