ज्याचें गुणनाम आठवितां मनचि नाहीं होय ।
अनुभवाचे पाय पुढें चालती ॥१॥
निर्गुणगे माय गुणवंत जाला ।
प्रतिबिंबीं बिंबतसे चैतन्याचें मुसे ।
प्रति ठसावत तें वृंदावनीं ब्रह्म असेगे माये ॥२॥
बापरखुमादेविवरु डोळसु सावळा ।
द्वैत अद्वैत सोहळा भोगविगे माये ॥३॥
अर्थ:-
त्याचे गुणनाम घेतले की मनच राहात नाही व अनुभव आठवला तर पाय चालत राहतात. त्या प्रतिबिंबात चैतन्याची मुस(साचा) दिसली तो निर्गुण, सगुण होऊन आला.ते सगुण ब्रह्मरुप वृंदावनात मी पाहात आहे. तेच रुप, मला द्वैत अद्वैत रुपाचा सोहळा, माझ्या डोळ्याना दाखवणारा, तो सावळा रखुमाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.