ऐसा अवतार नरहरि स्तंभामाझारी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३

ऐसा अवतार नरहरि स्तंभामाझारी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३

ऐसा अवतार नरहरि स्तंभामाझारी ।
भक्तांपरोपरी धरी रुपें ॥१॥
धरुनिया महीत्व झाला नृसिंहरुप ।
वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीस आला ॥२॥
बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु ।
वर्ण सारड्ग.धरु निजरुप ॥३॥

अर्थ:-
आपल्या भक्तासाठी परोपरीने विविध अवतार घेणारा स्तंभातुन नरसिंह बनुन आला. ज्या नरसिंह रुपाचे वर्णन वेदशास्त्र आधीच करु शकले नाहीत त्याचे महत्व धरुनच ते नरसिंहरुप प्रगटले. मुळ निजरुप असणारा शारंगधरच नरसिंह रुपाने आलेला तो रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

ऐसा अवतार नरहरि स्तंभामाझारी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.