दोन्ही बाहीं संतांची सभा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४२

दोन्ही बाहीं संतांची सभा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४२

दोन्ही बाहीं संतांची सभा ।
सिंहासनी उभा श्रीविठ्ठल ॥१॥
गाती नारद तुंबर प्रेमें ।
हरीचें नाम गर्जती ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु उभा ।
त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥२॥

अर्थ:-
सिंहासनावर तो श्री विठ्ठल उभा असुन त्याच्या दोन्ही बाजुला संतसभा भरली आहे. हरिनाम प्रेमाने घेत तेच नाम नारद तुंबर गात आहेत. तो रखुमाईचा पती विठ्ठल उभा राहिल्यावर त्र्यैलोकीची शोभा शोभुन दिसते असे माऊली सांगतात.

दोन्ही बाहीं संतांची सभा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.