गोपाळारे तुझें ध्यान लागो मना – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१५
गोपाळारे तुझें ध्यान लागो मना ।
आनु न विसंबे हरि जगत्रजीवना ॥१॥
सोनयाचा दिवस आजि अमृतें पाहीला ।
नाम आठवितां रुपीं प्रगट पैं झाला ॥२॥
तनु मनु शरण विनटलों तुझ्या पाई ।
रखुमादेविवरा वांचूनि आनु नेणें कांहीं ॥३॥
गोपाळारे तुझें ध्यान लागो मना – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१५
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.