चंचळ चांदिणें सोमविणें भासलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें ।
तेज निमालें रविबिंबेंविणें ॥१॥
जगत्रजीवनु ह्मणे जगासी कारण ।
तें अणुप्रमाण तेथे दिसे ॥२॥
बापरखुमा-देविवरु अणुप्रमाण भासला ।
सगुण निर्गुण जाला बाईये वो ॥३॥

अर्थ:-
त्याच्या रुपाकडे पाहिले की चंचल चांदणे चंद्रासह त्यात लोप पावते तद्वत सुर्य ही तेजासह लोप पावतो. तोच जगताचे कारण असुन तोच जगाचे जीवन आहे तरी ही त्याची व्याप्ती अणु प्रमाणे सुक्ष्म आहे. हे जीवरुपी सखी तो रखुमाईचा पती सुक्ष्म असुन सगुण व निर्गुण तोच झाला आहे. असे माऊली सांगतात.

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.