कापुराचें कलेवर घातलें करंडा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३९४

कापुराचें कलेवर घातलें करंडा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३९४


कापुराचें कलेवर घातलें करंडा ।
शेखीं नुरेंचि उंडा पाहावया ॥१॥
मा ज्योतिम मेळे कैसा उरेल कोळिसा ।
भावें ह्रषीकेशा भजतां ऐसें ॥२॥
ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी ।
नाम यज्ञें मिठी दिधलीया विरे ॥३॥

अर्थ:-

हवेत विरणाऱ्या कापुराचे अलंकार बनवुन हजरी करंड्यात जपुन ठेवले तरी ते विरुन जातात. तसेच कोळश्यानी अग्नी जवळ केला की कोळसेपणा राहात नाही तद्वत जीवाने हृषीकेशाचे भजन केले की जीवपणा राहात नाही. जीवपणात सर्वात खोटी वासना आहे परंतु नामयज्ञाची मीठी जीवाला पडली की ती वासना जीवपणा सकट नष्ट होते.


कापुराचें कलेवर घातलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३९४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.