चतुरपणें चतुराननु पैं भागला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३९

चतुरपणें चतुराननु पैं भागला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३९

चतुरपणें चतुराननु पैं भागला ।
शिवुपणें शिवरुपु पैं जाहला ॥१॥
हरिपणें हरि अंग रिघाला ।
या तिहींचा मेळा न दिसे गे माये ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तिहीं गुणां वेगळा ।
शक्ति नव्हे दादुला गे माये ॥२॥

अर्थ:-
तोच ब्रह्मा रुपाने सृष्टीची चतुर निर्मिती करता थकला व तोच शिवपणाने शिवरुप झाला.तोच हरिपणाने हरि अंग झाला हे जर एकत्व असले तरी हे जिवरुपी सखी मला त्याचा मेळ लागत नाही. असा तो तिन्हीगुणाहुन निराळा असणारा रखुमाईचा पती हा शक्ती नसुन माझा नवरा आहे. असे माऊली सांगतात.

चतुरपणें चतुराननु पैं भागला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.