आतसिकुसुमकोशशामघनु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३८

आतसिकुसुमकोशशामघनु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग  ३८

आतसिकुसुमकोशशामघनु ।
तुळशीवृंदावनामाजी मुनीमनोपद्मदळविशाळजिरे आयो ॥ध्रु०॥
जलधीशयन कमलालयाजीवनु ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु घनानंदुमुर्ति ॥१॥

अर्थ:-
तो तुळशीवृंदावनात असलेला अतिषय लहान फुलासारखा सावळ्या वर्णाचा आहे. तो त्या मुनींच्या विशाल कमळासारख्या असलेल्या मनात बसला आहे. त्या क्षीरसागरात शयन करणारा तो त्या कमळात उभ्या राहणाऱ्या लक्ष्मीचे जीवन आहे हे सखी तोच घनानंद विठ्ठल म्हणजेच रखमुदेवीचा पती आहे असे माऊली सांगतात.

आतसिकुसुमकोशशामघनु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग  ३८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.