संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

लाउनि मनगणीची दोरी विपरीत – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३४

लाउनि मनगणीची दोरी विपरीत – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३४


लाउनि मनगणीची दोरी विपरीत तयाची कुसरी ।
अकळून न कळे श्रीहरी ।
अवघे वोडंबर तुझें ॥१॥
अष्टदळकमळाची वोवरी ।
विपरीत तयाची कुसरी ।
एकविस खणांचे उपरी ।
बाहीजु कां हरी दाखविली ॥ध्रु०॥
तेथ रात्र दिवस नेणिजे ।
सोहं प्रकाश सहजे ।
नाचविसी पंचभूतें वोजे ।
कवतुक तुझें तूं पाहसी ॥२॥
भानु निसियेचा कुवासा ।
येक राहिले याचिये आशा ॥
येक ह्मणति अढळ धुरु कैसा ।
तयाचा भरंवसा त्यासिं नाही ॥३॥
ऐसीं तयाचीं बोलणीं ।
अंगीं राहिलीं खेळणीं ।
साही पावटणी करुनि ।
सातावरि घातु मांडिला ॥४॥
करीं घेऊनि आळवणी ।
करु नेणें वोवाळणी ।
बाप रखुमादेविवरा विठ्ठला चरणीं ।
चौघी जणी निमालिया ॥५॥

अर्थ:-
मनाची दोरी करुन त्याला बांधायला गेले तर तो नीट दिसतच नाही.तो अकळ आहे. असे अवघड अवडंबर तु रचले आहेस.हृदयातील अष्टदळ कमळ व २१ खण म्हणजे पंचप्राण, पंच कर्मेद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, पंच विषय व एक चित्त जरी असले तर त्याची विपरित अशी त्याची कुसरी आहे. त्याच्या ठायी रात्रंदिवस दिसत नाही,सोहं प्रकाश सहज दिसतो, पंचमहाभूतांना तो नाचवत असतो त्याचे कौतुक मी पाहात आहे. सुर्याने निवडलेले राहणे किंवा ध्रुवाने निवडलेले अढळस्थान हे एकच राहिल याचा भरवसा त्यांना ही नाही. असे याचे बोलणे आहे व सहा शास्त्रांची त्याने खेळणी केली आहेत. ती सहा शास्त्रे त्याला वर्णु शकत नाहीत पण त्याच्यात ती सर्व एकत्र लुप्त होतात.जशी एखादी सवाषिण हातात निरांजन घेऊन ओवाळणी करते तशी परा, पश्यंती मध्यमा वैखरी ह्या त्या विठ्ठलाच्या पायी निमाल्या आहेत असे माऊली सांगतात.


लाउनि मनगणीची दोरी विपरीत – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *