पैल सुखाचेनि माये सुकाळु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३२

पैल सुखाचेनि माये सुकाळु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३२

पैल सुखाचेनि माये सुकाळु ।
नवल पाहिजे हो गोपाळु ।
म्हणोनि योगयाग तप साधन ।
व्रत दान उद्यापन ।
पंचाग्नि गोरांजन अनुष्ठान ।
परि पद निर्वाण नकळें हें ॥१॥
तुझ्या नामाचिनि आनंदे ।
गातांवातां जोडसी विनोदें रया ॥ध्रु०॥
या गोंवळेनि जग ।
न दिसे जगपण भाग ।
पाहेपां सकळीं योग ।
तुझा तूंचि ॥२॥
अर्थुनि पाहे दृष्टि ।
तंव तुझ्यापायीं पडे मिठी ।
आवडी नोसंडी गांठी ।
तुझिया पायाची ॥३॥
आतां जरि निरुतें ।
तूंचि आत्मा तूंतें ।
सुखी सुखाचेनि निजप्राप्ति रया ॥४॥
तुझें स्वरुप अदृष्य ।
तो मुनिमानसींचा प्रकाश ।
इंदु तूं पूर्णांश ।
चैतन्यघन ॥५॥
बाप रखुमादेविवरा विठ्ठला पाहतां उघडा डोळा ।
दाविलें निधान रया ॥६॥
अर्थ:-
विषयसुखाच्या पलिकडचे ब्रह्मसुख त्याच्या जवळ आहे.असा तो गोपाळ मी पाहिला त्याच्या प्राप्तीसाठी लोक योग याग तप ही साधने व्रत दान उद्यापन पंचाग्नी गोरांजनांसारखी अनुष्टाने करतात.तरी त्याना तो दिसत नाही.त्याची अनासायास प्राती करायची तर फक्त त्याचे नाम आनंदाने गात राहणे हा एकच मार्ग आहे.या गोपाळाचे जग हे गोकुळ आहे पण त्यात जगपण नाही.त्यात सर्वत्र तोच तो होऊन व्यापला आहे. तुझा अर्थ करायला गेला तेंव्हा तुझ्या पायी मिठी पडते.व फक्त त्या पायांची आवडच उरते. आता तुच तुझा आत्मा आहेस आशा सुखाची सुखप्राप्ती होते. तु तो असा चैतन्यघन आहेस की तुझे स्वरुप अदृष्य आहे. त्या मुनीजनांचा तु ज्ञानप्रकाश आहेस, तु जणु काही कैवल्याचा पूर्ण चंद्रच आहेस. अशा श्री विठ्ठलाला पाहता त्याने दाखवलेली यथार्थ ज्ञान त्याच्याच स्वरुपात दिसते असे माऊली सांगतात.

पैल सुखाचेनि माये सुकाळु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.